शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’ 24 तासात पाच लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत सिंचननगर येथून वैभव रामभाऊ नाकट यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविली. त्याच रात्री दरम्यान भोसा रोड सव्वालाखे ले-आऊट येथील नितीन कैथवास यांच्या घरून तीन लाख २८ हजारांची रोख चोरून नेली. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौकातून सुरक्षा रक्षक सिद्धेश्वर दुधे याची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात चोर मचाये शोर अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील २४ तासात शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्या आहेत. यात यवतमाळ शहरातील तीन लाख २८ हजारांची घरफोडी, तीन दुचाकी चोरी, धान्य गोदामातून धान्य लंपास व कृषिपंपाचीही चोरी समाविष्ट आहे.  असा एकूण चार लाख ७१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. चोरट्यांना पोलिसांचे कोणतेच भय राहिलेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत सिंचननगर येथून वैभव रामभाऊ नाकट यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविली. त्याच रात्री दरम्यान भोसा रोड सव्वालाखे ले-आऊट येथील नितीन कैथवास यांच्या घरून तीन लाख २८ हजारांची रोख चोरून नेली. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौकातून सुरक्षा रक्षक सिद्धेश्वर दुधे याची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. स्टेट बँक चौकातून पुंडलिक आडे रा. बाजाेरियानगर यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. शहरात चोरटे धुमाकूळ घालत असतानाच ग्रामीण भागातही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. महागाव तालुक्यातील माेरथ येथे अमोल रामदास तगडपल्लेवार यांच्या गोदामातून २५ हजार रुपये किमतीची तूर चोरीला गेली. महागाव तालुक्यातील वाकोडी शेतशिवारातील अजिंक्य गणेश रचकुंटवार यांच्या शेतातून ३८ हजार रुपये किमतीचा कृषिपंप व इतर साहित्य चोरीला गेले. चोरटे शिरजोर झाल्याने मालमत्ता व रोख सुरक्षित कशी ठेवायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात चोरीचा गुन्हा उघड झालेला नाही. चोरटे मनमर्जीने हात साफ करीत आहे. पोलीस केवळ गुन्हा नोंदविण्यापुरतेच आहे का, तपासाची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे.यवतमाळात दरदिवशी चोरीच्या घरफोडीच्या, वाटमारीच्याही घटना वाढत आहेत. तर या चोरीचा छडा लावण्यात पोलीस कमी पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

 गेल्या वर्षभरात चोरीच्या गुन्ह्यांची निर्गती नाही - चोरीच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तपास पूर्ण केला जात नाही. तपास अधिकारी अ फायनल असा शेरा देत अंतिम अहवाल सादर करतो. गुन्हा कायम तपासावर ठेवून तपास अधिकारी स्वत:ची सुटका करून घेतो. गेल्या वर्षभरात चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात हा प्रकार वाढला आहे. गुन्हा उघडच झाला नाही, असे सांगून पोलीस आपली एकप्रकारे जबाबदारीच झटकत आहे.

 

टॅग्स :Thiefचोर