शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

गणेशोत्सवात व्यसनांचे विसर्जन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 9:16 PM

आगामी पोळा, बकरी ईद, गणेशोत्सवात सर्वधर्मीयांनी तारतम्य ठेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, सण-उत्सवात शांतता कायम रहावी म्हणून नागरिकांनी दहा दिवस उपवास करा,.....

ठळक मुद्देमनोहरराव नाईक : पुसद येथे शांतता समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : आगामी पोळा, बकरी ईद, गणेशोत्सवात सर्वधर्मीयांनी तारतम्य ठेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, सण-उत्सवात शांतता कायम रहावी म्हणून नागरिकांनी दहा दिवस उपवास करा, सर्व व्यसनांचे गणेशोत्सवात विसर्जन करा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा, असे आवाहन आमदार मनोहरराव नाईक यांनी शनिवारी येथे केले.पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित शांतता समितीच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, तहसीलदार डॉ. संजय गरकल, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गणेश मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी अनिवार्य असल्याचे सांगितले. नोंदणी न करणाºया मंडळाच्या अध्यक्ष, सचिवाविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दारुबंदी व जुगारबंदी असलीच पाहिजे, यासाठी एसडीओ आणि तहसीलदारांनी दररोज सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत शहरातील मंडळांना भेटी देऊन निरीक्षण करण्याची सूचना दिली. तसेच नागरिकांना अनुचित प्रकार आढल्यास त्यांनी आपल्याला अवगत करावे, असे त्यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी तर पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्टÑपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पुसदकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. पोलीस दलाच्यावतीने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष ताहेर खान पठाण यांनी मांडलेल्या गणेश मंडळात मुस्लीम बांधवांचा सहभाग या सूचनेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी अनिता रेवणवार, रेश्मा लोखंडे, सुधीर देशमुख, अनिल जोशी, भीमराव कांबळे, ताहेर खान पठाण, संजय हनवते, साहेब खान, शरद पाटील आदींनी सूचना मांडल्या. प्रास्ताविक ठाणेदार वाघु खिल्लारे यांनी संचालन प्रा. स्वाती दळवी व एपीआय गजेंद्र क्षीरसागर यांनी केले. यावेळी वसंतनगरचे ठाणेदार प्रकाश शेळके, ग्रामीणचे धनंजय जगदाळे, खंडाळाचे बाळू जाधवर, धीरज चव्हाण, दीपक आसेगावकर, मो. नदीम, महेश खडसे उपस्थित होते.