शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

घोन्सा येथील दवाखाना ढासळला

By admin | Updated: November 15, 2014 22:55 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचारवणी : तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचार करावे लागत आहे. तरीही आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.गेल्या कित्येक वर्षांपूर्वी घोन्सा येथे आयुर्वेद दवाखान्यासाठी वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या १0 वर्षांपूर्वी या वास्तूच्या मागील बाजूची अर्धी भिंत कोसळली होती. परिणामी समोरील एकच खोली रूग्णांच्या उपचारासाठी शिल्लक राहिली आहे़ आता शिल्लक उरलेल्या वास्तूलाही अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. जागोजागी तडे गेले आहेत. ही वास्तू कधी आणि कुणावर कोसळेल, याचा कोणताच काही नेम उरला नाही. त्यामुळे तेथे कार्यरत डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करावे लागत आहे़ घोन्सा येथील या दवाखान्याच्या वास्तूची प्रचंड दुर्दशा होत असताना तालुका आरोग्य विभाग मूग गिळून आहे. अद्याप या वास्तूच्या दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांसह दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांचाही जीच संकटात सापडला आहे. वास्तू त्यांच्यावर कोसळल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता बळावली आहे. तरीही तेथे उपचार सुरूच आहे. पडक्या वास्तूतही रूग्ण उपचार घेण्यासाठी जातच आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र आरोग्य विभाग अद्याप कुंभकर्णी झोपतेच आहे.या दवाखान्यात परिचराचे पदही गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. परिणामी दवाखान्याचा पूर्ण भार तेथे कार्यरत एकमेव डॉक्टरांवर येऊन पडला आहे. एकाच डॉक्टरला सर्व काम सांभाळावे लागत आहे़ त्यामुळे त्यांनाही नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या जीर्ण वास्तूबाबत दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे माहिती दिली. मात्र त्यांच्या माहितीची आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही़ दवाखान्यात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे परंतु वास्तू मात्र पूर्णत: खचलेली आहे़ या वास्तूवरील कवेलू फुटल्यामुळे पावसाळ्यात दवाखान्यात पाण्याचे तळे साचते़ त्यामुळे चक्क दवाखान्याचेच आरोग्य धोक्यात सापडते़ या दवाखान्याच्या जीर्ण वास्तूत पाणी गळत असल्याने रूग्णांवर कसा उपचार करावा, असा प्रश्न तेथील डाक्टरांना पडतो. जुन्या वास्तूचे बांधकामही निकृष्ट झाल्याने हा प्रकार उद्भवला आहे. कार्यरत डॉक्टरांनी काम करावे लागते म्हणून तूर्तास या वास्तूची थोडी फार तात्पुरती डाागडुजी करवून घेतली आहे. तरीही वरिष्ठ लक्ष द्यायला तयार नसल्याने आता त्यांचीच गोची झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)