शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विधवा अर्थसहाय्यात ‘बीपीएल’चा अडसर

By admin | Updated: March 6, 2015 02:14 IST

पतीच्या निधनानंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतून विधवा महिलांना मदतीचा हात दिला जातो. मात्र अलिकडे या मदतीसाठी दारिद्र्यरेषेचे कार्ड आवश्यक केले आहे.

महागाव : पतीच्या निधनानंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतून विधवा महिलांना मदतीचा हात दिला जातो. मात्र अलिकडे या मदतीसाठी दारिद्र्यरेषेचे कार्ड आवश्यक केले आहे. मात्र अनेक विधवा महिलांजवळ कार्डच नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. महागाव तालुक्यात शेकडो प्रकरणे केवळ दारिद्र्यरेषेच्या कार्डासाठी प्रलंबित असून अनेकांनी तर प्रस्तावच सादर केले नसल्याची माहिती आहे.राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतून विधवा निराधार महिलेला २० हजार रुपयांची मदत केली जाते. तसेच त्यांना दरमहा ६०० रुपये निराधार दिला जातो. मात्र या योजनेसाठी आता दारिद्र्यरेषेच्या कार्डाची अट टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे २००२ पासून म्हणजे तब्बल १३ वर्षांपासून दारिद्र्यरेषेच्या कार्डासाठी सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे नवीन कार्डाचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्याजवळ कार्ड आहे, त्यांना मदत मिळते. परंतु तालुक्यात शेकडो विधवा महिला आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे. शासकीय योजना असताना केवळ दारिद्र्यरेषेचे कार्ड नसल्याने या महिलांना मदत मिळत नाही. २००२ नंतर तालुक्यात अनेक विधवा महिलांनी तहसीलकडे अर्ज साधर केले. परंतु दारिद्र्यरेषेच्या कार्डाची अट घातल्याने त्यांना २० हजार रुपये मिळत नाही. तर ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेचे कार्ड आहे असे अनेक प्रस्तावही प्रलंबित आहे. दारिद्र्यरेषेचे कार्ड नसल्याने अनेक महिलांनी तर आपले प्रस्तावच सादर केले नाही. शासनाची ही योजना उपयुक्त असताना केवळ एका अटीमुळे मदतीपासून वंचित राहावे लागते. तालुक्यातील केवळ २७२ विधवा महिलांना या अटीमुळे ६०० रुपये महिना मिळत आहे. ही अट रद्द केल्यास याचा फायदा तालुक्यातील शेकडो महिलांना होवू शकते. त्यासाठी दारिद्र्यरेषेच्या कार्डाची अटच रद्द करणे आवश्यक झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)