शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: May 30, 2015 02:36 IST

डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी दिसत आहे.

उमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी दिसत आहे. बहुतांश कर्मचारी शहराच्या ठिकाणी मुक्कामी राहून कारभार पाहताना दिसत आहे. परिणामी विकास कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या शोधात शहर पालथे घालावे लागते. उमरखेड तालुका हा डोंगरदऱ्या आणि जंगलांमध्ये वसलेला आहे. अनेक गावे दुर्गम आहे. याठिकाणी असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आदींची प्रत्येक गावात नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे करीत कर्मचारी उमरखेड अथवा शहराच्या गावी परिवारासह राहतात. आरोग्य सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांचेही मनोबल वाढत आहे. अभयारण्यात अनेक गावात शासनाने आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. मात्र कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गंभीर रुग्णाला घेऊन उमरखेड गाठावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेने अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होतो. परिणामी रुग्ण रस्त्यातच गतप्राण होतो. मात्र या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षकही जाणे येणे करताना दिसून येतात. उशिरा जाणे आणि लवकर निघणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. अनेकदा तर दुर्गम गावात शिक्षक पोहोचतही नाही. त्यादिवशी विद्यार्थी सुटीचा आनंद घेतात. लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास कोणताही उपयोग होत नाही. तलाठी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कर्मचारी आहे. मात्र तलाठ्यांचे दर्शन गावकऱ्यांना दुर्लभ होते. प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांची गरज असते तेव्हा गावकरी उमरखेड शहरात तलाठ्यांचा शोध घेतात. विद्यार्थ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. ग्राम विकासातील दुवा असलेल्या ग्रामसेवकाचेही असेच आहे. ग्रामसेवक केवळ बैठकीला उपस्थित राहतो. त्यानंतर मात्र त्यांचे दर्शनही होत नाही. वनकर्मचारीही आपल्या कामात कुचराई करताना दिसून येतात. गस्तीअभावी जंगलातील सागवान तस्कर दिवसाढवळ्या तोडून नेत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे शहरात राहून कारभार पाहतात. अनेक कर्मचारी तर मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून घरभाडेही घेतात. या सर्व प्रकारामुळे विकास कामांचा मात्र खोळंबा होत आहे. (प्रतिनिधी)