किनवट परिसराला वादळाने झोडपले

By Admin | Updated: June 11, 2017 00:21 IST2017-06-11T00:21:26+5:302017-06-11T00:21:26+5:30

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. बियाणे,

The harbor area swept away | किनवट परिसराला वादळाने झोडपले

किनवट परिसराला वादळाने झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. बियाणे, खत व सिमेंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सराटी मार्गावर झाड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता. किनवट येथे ४० घरांचे नुकसान झाले. दोन घरे जमिनदोस्त झाली.
घरकुलाच्या बांधकामासाठी आणलेले सिमेंट पावसामुळे खराब झाले. शेतात टाकण्यासाठी आणलेली बियाणे, खतांची नासाडी झाली. घरामध्ये पाणी शिरल्याने धान्य भिजले. वादळाने टीनपत्र उडाल्याने जनावरांना इजा झाली. गावातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. विद्युत तारा ठिकठिकाणी तुटून पडल्या आहेत. शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेले शौचालयही कोसळले.
गारांसह पाऊस झाल्याने शेतात शेतकरी, शेतमजुरांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकल्यांनी जीव वाचविण्यासाठी एकमेकांचा आधार घेतला. पिंपळशेंडा येथे अनेक घरावरील टीनपत्रे उडाली. विद्युत खांब वाकले, विद्युत तारा कोसळल्या. पाऊस आणि वादळामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आज संपूर्ण दिवसभर कामांचीही गती कमी झाली होती. संबंधित विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दारव्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
दारव्हा : शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दोन तास कोसळलेल्या या पावसाची ९६ मि.मी. एवढी नोंद झाली आहे. मध्यरात्री विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसाने नगरपरिषद प्रशासनाची झोप उडविली. शहरातील नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी पाणी अडल्याने रस्ते आणि खुल्या जागांना नाल्याचे स्वरूप आले होते. पाणी साचल्याने काही जणांच्या घरातसुद्धा पाणी शिरले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नदीनाल्यांनाही पूर आला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरी सुखावला आहे.

 

Web Title: The harbor area swept away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.