शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दंडुक्याने अर्धे गाव घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण कारण नसताना मंगळवारी सकाळी रस्त्यांवर फिरताना दिसून आले.

ठळक मुद्देवणी शहर : रस्त्यावर उनाडक्या करणाऱ्या तरूणांना फटके, गस्त वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वारंवार विनंत्या करूनही लोक अकारण रस्त्यावर येत असल्याने अखेर मंगळवारी वणी पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागला. उनाडक्या करत रस्त्यावर भटकणाऱ्या अनेकांना दंडुके लगावल्यानंतर काही वेळातच, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. पोलिसांच्या दंडुक्याची अनुभूती घेतल्यानंतर नागरिकांनी आपापल्या घरात राहणे पसंत केले. त्यामुळे वणी शहरात सकाळी १० वाजतानंतर बऱ्यापैकी परिस्थिती आटोक्यात आली.कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण कारण नसताना मंगळवारी सकाळी रस्त्यांवर फिरताना दिसून आले. ही बाब लक्षात येताच, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, ठाणेदार वैैभव जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरलेत. नेहमी गजबजून राहणाºया टिळक चौैकात नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखविण्यास सुरूवात करताच, लोक सैैरावैरा पळू लागले. अवघ्या काही वेळातच रस्ते निर्मणुष्य झाले. दुपारी वणीतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी मात्र पुन्हा नागरिक दुचाकीद्वारे वणीच्या रस्त्यावर फिरताना दिसून आलेत. मात्र जे लोक कारणाने बाहेर पडले, त्यांना पोलिसांनी सूट दिली. मात्र इतरांना दंडुके खावे लागले.होम क्वारंटाईन असणाऱ्यावर कारवाईवणी शहरात होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी हा आकडा ४१० वर पोहचला. मात्र यांपैैकी अद्याप कुणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाही. या सर्वांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. यांपैैकी दुबईतून परत आलेला एक व्यक्ती घराबाहेर पडत असल्याचे दिसताच, मंगळवारी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कलम १८८, २६९ अन्वये कारवाई केली. घरात राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही काही लोक बाहेर फिरत असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या