शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा कागदावरच

By admin | Updated: August 21, 2015 02:56 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या.

महागाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ग्रामसेवकांच्या रिक्त पदाने निम्म्या पेक्षा अधिक ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे कामकाज कागदावर नोंदवून सोपस्कार पार पाडले. महागाव तालुक्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहे. तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी ६६ पदे मंजूर आहे. त्यापैकी ४१ ग्रामसेवक कार्यरत होते. त्यापैकी पाच जणांची बदली, सहा जण निलंबित आणि तीन जण कायम रिकामे आहे. तर तीन ग्रामसेवकांची निवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. तर पोपुलवाड नावाचा ग्रामसेवक अडीच वर्षांपासून विना परवानगी गैरहजर आहे. त्यामुळे ७६ ग्रामपंचायतीचा कारभार केवळ २६ ग्रामसेवकांच्या भरोश्यावर सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामसभेला सरपंचासोबतच ग्रामसेवकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ७६ ग्रामपंचायती आणि २६ ग्रामसेवक अशा परिस्थितीत ग्रामसभा घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी शिक्षकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला. २२ ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे सोपस्कार पार पाडले. घरकुल, शौचालय, प्लास्टिक निर्मूलन, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा तीन टक्के निधी अपंगावर खर्च, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामसभेत समित्या स्थापन करणे, आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तयार करणे, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, सिंचन विहिरींची प्रतीक्षा यादी, ग्रामस्तरीय दक्षता समिती आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु शिक्षकांना या बाबीची माहिती नाही. त्यामुळे केवळ शासकीय सोपस्कार पार पाडून महत्वाच्या विषयावर चर्चाच झाली नाही. विशेष म्हणजे ७६ ग्रामपंचायतीसाठी १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला हजर रहावयाचे होते. परंतु ७६ ठिकाणी १२ अधिकारी एकाच वेळी कसे उपस्थित राहतील हा ही प्रश्नच आहे. एका दिवशी आठ ग्रामसभा घेता येणे शक्य नाही. ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने विकास कामांचा बोजवारा उडत असून आता ग्राम विकासासाठी ग्रामसेवकांची नियुक्ती कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)