दिग्रस येथे हज प्रशिक्षण शिबिर

By Admin | Updated: August 19, 2015 02:46 IST2015-08-19T02:46:47+5:302015-08-19T02:46:47+5:30

जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर दिग्रस येथे पार पडले. या शिबिरात ८० महिला व पुरुष हज यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यांना फलक, साहित्य, ओव्हर हेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Haj training camp at Digras | दिग्रस येथे हज प्रशिक्षण शिबिर

दिग्रस येथे हज प्रशिक्षण शिबिर

दिग्रस : जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर दिग्रस येथे पार पडले. या शिबिरात ८० महिला व पुरुष हज यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यांना फलक, साहित्य, ओव्हर हेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह केंद्रीय हज कमिटीने सर्व हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. त्यात विदेशी चलन, विमान प्रवास, पारपत्र, विमानतळावरील तपासणी, लगेज, आंतरराष्ट्रीय नियम, लसीकरण, मका व मदिना येथील मुक्काम तसेच विविध धार्मिक इसलामी महत्व, स्थळांचा इतिहास आदी बाबी माहिती देण्याचे आदेश आहे. या एक दिवसीय शिबिराच्या अध्यक्षस्थानी अंजूमन उर्दू संस्थेचे अध्यक्ष रफिक पहेलवान होते. कार्यक्रमाला पुसद अर्बन बँकेचे संचालक कुद्रूस मिर्झा, प्राचार्य मकसूद अहमद उपस्थित होते. यावेळी उमराह, तवाफ, सई, जमजम, हलक, हज, मिना, अरफाज, मुजदल्फा, रमी-जमरात, तवाफे जिरायत, तवाफे विदा, मदिना, अमराह, कुर्बानी आदी धार्मिक विधी बद्दल राज्य हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक हाजी एजाजोद्दीन, हाजी मोहंमद निसार आणि महिलांना सालेहा नाहीद एजाजोद्दीन यांनी माहिती दिली.
यावेळी जमीर खान व सुफी देशमुख यांनी प्रेषित स्तवन सादर केले. डॉ. सुरैय्या फातेमा व डॉ. फैजान बेग यांनी हज यात्रेकरूंची तपासणी केली. कार्यक्रमाला मजहर अहमद खान, मोहंमद शफीक, हसीन खान, मोहंमद मुद्दसर, साहेल जावेद, मोहंमद हनीफ, मसुद खान, मोहंमद नूर, म. नासीर, अहेमद खान, तनवीर बाबू, मुख्तार बाबू, हनुमान रामावत आदी उपस्थित होते. या शिबिरात यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव, काळी दौलत, पांढरकवडा, घाटंजी, जांबबाजारसह नांदेड जिल्ह्यातील माहूर, वाईबाजार येथील हज यात्रेकरू उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Haj training camp at Digras