शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकडे निघालेला २० लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: May 29, 2016 02:37 IST

हैदराबाद येथून चोरट्या मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या गुटख्याचा ट्रक मारेगाव पोलिसांनी पकडून तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला.

पांढरदेवी जंगलात ट्रक पकडला : मारेगाव पोलिसांची कारवाईमारेगाव : हैदराबाद येथून चोरट्या मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या गुटख्याचा ट्रक मारेगाव पोलिसांनी पकडून तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला. वन विभागाने दिलेल्या माहितीवरून शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिसांनी पांढरदेवी जंगलात ही कारवाई पार पाडली.आयशर कंपनीचा ट्रक (एम.पी.२८-टी.ई.९३८४) हा पांढरदेवी जंगलात संशयास्पद स्थितीत उभा होता. वन कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक व वाहकाकडे सहज चौकशी केली. त्या ट्रकमध्ये ‘नजर’ कंपनीचा गुटखा असून तो नागपूरला नेत असल्याचे सांगितले. वनरक्षक रामेश्वर मेंढले यांनी लगेच याबाबत वन विभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ मारेगाव पोलिसांना कळविले.मारेगावचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोसे यांनी त्वरित पथकासह घटनास्थळ गाठले. तेथून चालक म. ईब्राहिम म. गुलाब रसूल (२८) व वाहक सैय्यद नईम सय्यद हुसैन (२६) दोघेही रा. हैदराबाद यांना ताब्यात घेऊन गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केला. यावेळी यवतमाळ येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. सायंकाळी उशिरा त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असून त्याची किंमत अंदाजे २० लाख रूपयांच्या वर असल्याचे सांगितले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरूच होती. या ट्रकचा मालक हैदराबाद येथील असल्याची माहिती आहे.एका संघटनेच्या युवकांनी केला ट्रकचा पाठलागहैदराबाद येथून हा ट्रक नागपूरकडे निघाला असताना एका कारने त्याचा पाठलाग केला. कारमध्ये एका संघटनेचे युवक होते. त्यांनी ट्रक चालक व वाहकाला मारहाण करून ट्रक मालकाला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे घाबरलेल्या चालक व वाहकाने राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक वाईमार्गे जळका जंगलात आणून उभा केला होता. चालक व वाहकाला मारहाण करणारे ते युवक कोण व ती कार कोणाच्या मालकीची, याचा पोलीस शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)