शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी तपासला अन्नाचा दर्जा

By admin | Updated: October 8, 2015 02:15 IST

पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी सायंकाळी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘किचन’ला अचानक भेट दिली.

स्वत: घेतले भोजन : ‘मेडिकल’च्या किचनची केली तपासणीयवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी सायंकाळी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘किचन’ला अचानक भेट दिली. रुग्णांसाठी शिजणाऱ्या अन्नाचा दर्जा स्वत: भोजन करून तपासला. किचनमध्ये कर्मचारी रुग्णांसाठी डाळभाजी, चपाती, भात आदी अन्न शिजवित होते. ते कशा पद्धतीने शिजविले जाते, किचनची स्वच्छता, किराणा, पाण्याची व्यवस्था, अन्न पदार्थांचा दर्जा आदी बाबींची ना. राठोड यांनी पाहणी केली. त्यांनी तयार झालेल्या पदार्थांची चव घेऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा उपस्थित मदतनिसांनी चपाती, डाळभाजी, भात, लोणचे आदी पदार्थ असलेले ताट त्यांना करून दिले. यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जात तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगितले. शिवाय अन्नाची तपासणी नियमित करण्याचे निर्देश त्यांनी अधिष्ठातांना दिले. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात गेल्या आठवड्यात एका शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीशी झालेल्या प्रकाराची दखल घेऊन त्यांनी या परिसरात सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांची पूर्णवेळ गस्त सुरू करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या. ही गस्त सुरू झाली की नाही याचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच मेडिकल परिसरात लाईट्स लावण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले. परिसरात वाढलेली झुडपं तत्काळ काढून स्वच्छता करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. सुरक्षेच्यादृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार एकाच ठिकाणी असावे, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी चेतन जनबांधे, बाळू चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता होतवाणी, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, विकास क्षीरसागर, राजू गिरी आदी होते. (वार्ताहर)