शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST

गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर

वसंतनगर : गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुणी पुढाकार घेतानाही दिसत नाही.ग्रामीण भागात विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कर्मचारी सहाय्यभूत ठरतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दिवाबत्ती, अंगणवाडी, समाजमंदिर आदींची देखभाल या कर्मचाऱ्यांना करावी लागते. परंतु त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते. एप्रिल २०१४ पासून शासनाच्या नियमानुसार दोन हजार ५०० रुपये त्यांच्या मानधनात वाढ झाली. मात्र अद्यापही मिळाली नाही. पूर्वी दोन हजार ६०० रुपये ग्रामपंचायत देत असते आणि एप्रिलपासून दोन हजार ६०० ग्रामपंचायत आणि शासनाकडून दोन हजार ५०० म्हणून पाच हजार १०० रुपये त्यांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही २६०० रुपयावरच त्यांना काम करावे लागत आहे. वरिष्ठही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे त्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात आले. १०० रुपये स्वत:चे आणि शासनाचे १०० रुपये अशा पद्धतीने जमा करण्यात आले. परंतु अनेक कर्मचाऱ्यांचे खातेसुद्धा बंद पडले आहे. दिवसभर गावातील समस्या सोडवत राबायचे. परंतु शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या तयारीत आहे.(वार्ताहर)