शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

नातवाला पाहण्यासाठी निघालेल्या आजी-आजोबाला वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि अनुसया मोहन टेकाळे  (६०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एसटी महामंडळात नोकरीवर आहे. त्याचे गेल्या वर्षीच लग्न झाले. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. उमरखेड येथे खासगी रुग्णालयात सुनबाईची प्रसूती झाली. आता नवजात नातवाला पाहण्यासाठी म्हणून टेकाळे दाम्पत्य रविवारी सकाळीच दुचाकीने (एमएच २९ बीजे ३६०८) उमरखेडकडे निघाले होते.  

ठळक मुद्देदुचाकीला धडक : महागाव-बिजोरा रस्त्यावर भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव :  नवजात नातवाला बघायला जात असलेल्या आजी आजोबावर क्रूर काळाने घाला घातला. दुचाकीवरून जात असलेल्या या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने चिरडले. या हृदयद्रावक दुर्घटनेत वृद्ध पती पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुडाणा ते बिजोरा दरम्यान तेलतवाडी फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० वाजता हा भीषण अपघात झाला. मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि अनुसया मोहन टेकाळे  (६०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एसटी महामंडळात नोकरीवर आहे. त्याचे गेल्या वर्षीच लग्न झाले. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. उमरखेड येथे खासगी रुग्णालयात सुनबाईची प्रसूती झाली. आता नवजात नातवाला पाहण्यासाठी म्हणून टेकाळे दाम्पत्य रविवारी सकाळीच दुचाकीने (एमएच २९ बीजे ३६०८) उमरखेडकडे निघाले होते.  मात्र अज्ञात वाहनाची धडक बसून नातवाला न पाहताच आजी-आजोबाचा करुण अंत झाला. अज्ञात वाहनाची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. मृतकाच्या खिशामध्ये आधार कार्ड मिळून आल्यामुळे त्यांची तात्काळ ओळख पटली. 

जेवणाचा टिफिन तसाच राहिला...- टेकाळे दाम्पत्याची दोन्ही मुले बाहेरगावी असतात. त्यापैकी मोठा मुंबईला एसटी महामंडळामध्ये नोकरीला आहे. त्यालाच पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे हे दाम्पत्य मोठ्या आनंदात जेवणाचा टिफिन आणि आवश्यक वस्तू घेऊन उमरखेड येथे नातवाला पाहण्यासाठी निघाले होते. लहान मुलगा सौदी अरेबियामध्ये कंपनीत कामावर आहे. सुखी संसाराचे दिवस पाहण्याची वेळ आलेली असतानाच या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. सवना या त्यांच्या मूळगावी एकाच चितेवर दोघांनाही मोठ्या मुलाने भडाग्नी दिला. नातवाला पाहण्याचे आजी-आजोबाचे स्वप्न अधुरेच राहून गेले. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू