शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चांगले वाचन घडविते चांगला माणूस

By admin | Updated: January 12, 2016 02:17 IST

माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते.

रमाकांत कोलते : मराठी संवर्धन पंधरवडादिग्रस : माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते. म्हणून विद्यार्थ्यांनीही चांगल्या ग्रंथांचं भरपूर वाचन करावे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.रमाकांत कोलते यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत येथील बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य आणि बा.पा. विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘मराठी वाचन संस्कृती आणि मराठीतील अभिजात ग्रंथसंपदा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.रविकिरण पंडित, डॉ.अपर्णा पाटील होत्या. प्रा.डॉ.कोलते म्हणाले, संत तुकारामांनी ‘आधी पाठ केली संतांची उत्तरे’ हे प्रांजळपणे सांगितले, तर महात्मा चक्रधरांनी श्रवण पठन मनन हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सांगतांना वाचनाचे महत्त्व विषद केले. विनोबांनी विचार हाच आचाराचा बाप आहे, असं म्हटलं आहे आणि हा विचार वाचनातून निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘शासन व्यवहारात मराठीचा वापर’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक किरण आडे, द्वितीय अश्विनी गावंडे, तृतीय प्राजक्ता राठोड यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन खंडारे यांनी काम पाहिले. या पंधरवडाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)