कवठाबाजारला विदेशी पाहुण्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:09+5:30

विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्टीना आणि लोविसा टेंगलीन या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. वेळेवर आलेल्या विदेशी पाहुण्यांचे शाळेने स्वागत केले. शाळेचे आदरातीथ्य बघून त्या भारावून गेल्या.

Gift of foreign guests to Kawthabazar | कवठाबाजारला विदेशी पाहुण्यांची भेट

कवठाबाजारला विदेशी पाहुण्यांची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील कवठाबाजार गावाला रविवारी विदेशी महिलांनी भेट दिली. त्यांनी गावाची पाहणी करून विविध विकास कामांची माहिती ोतली.
विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्टीना आणि लोविसा टेंगलीन या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. वेळेवर आलेल्या विदेशी पाहुण्यांचे शाळेने स्वागत केले. शाळेचे आदरातीथ्य बघून त्या भारावून गेल्या.
या फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या महिन्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची ‘आई’ या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याच स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी अचानक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला कार्यशाळा आयोजित करून त्यांना ‘भीती’ या विषयावर चित्र काढायला सांगितले. नंतर आनंद झाल्यावर तो कसा व्यक्त करतो आणि आई सध्या काय करते, या विषयावर चित्र काढण्यास सांगितले. मुलांनी चित्रांचे रेखाटन केले. त्यांच्या कलाकृती बघून थक्क झालेल्या स्विडन कन्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी केले. यावेळी केंद्र प्रमुख कल्पना हजारे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्पना कुरटवाड, सरपंच संगिता चौधरी, पोलीस पाटील रामेश्वर चौधरी व नागरिक उपस्थित होते. अंकुश मोरे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Gift of foreign guests to Kawthabazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा