शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी घाटंजीत स्वामिनींचा मोर्चा

By admin | Updated: March 28, 2017 01:25 IST

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राज्य शासनाने अवमान केला आहे.

घाटंजी : राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राज्य शासनाने अवमान केला आहे. पळवाट काढून दारू दुकाने वाचविण्यासाठी केलेला नियम रद्द करून सर्व दारू दुकाने बंद करावी, या मागणीसाठी स्वामिनी दारूबंदी अभियानच्यावतीने घाटंजी येथे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. जलाराम मंदिर येथून निघालेला मोर्चा नगरपरिषदेवर धडकला. नगराध्यक्ष नयना ठाकूर यांना निवेदन सादर केले. शहराच्या सीमेंतर्गत नवीन दारू दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देवू नये, अशी मागणी यातून करण्यात आली. तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, यासाठीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. स्वामीनीचे महेश पवार यांनी मोर्चाला संबोधित केले.या आंदोलनात मनोज राठोड, अनंत कटकोजवार, प्रशांत उगले, गजानन भालेकर, अंकुश ठाकरे, विश्वास निकम, प्रशांत मस्के, वैभव निखाडे, पार्वता भंडारजवार, रवी भोजवार, ललिता राठोड, साधना माडुरवार, मोरेश्वर वातीले, प्रदीप बावने, गणेश उन्नरकर, हर्षल भोयर, चंद्रशेखर नमुलवार, राजेश उदार, रा.वि. नगराळे, अमोल ढगले, उमेश मराठे, सुभाष देवळे, बालाजी कदम, राम आईटवार, विनोद देवतळे, मनोज ढगले, नीलेश चव्हाण, रणजित बोबडे, धनंजय भोरे, शेखर सरकटे, मनीषा काटे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)