वन विभागाकडून अनुदानावर गॅस

By Admin | Updated: September 22, 2014 23:36 IST2014-09-22T23:36:15+5:302014-09-22T23:36:15+5:30

सध्या प्रचंड जंगलतोड होत असल्याने ती थांबविण्याकरिता व जंगलांचे रक्षण करण्याकरिता वन विभाग अनुदानावर ग्रामस्थांना गॅस जोडणी देणार आहे.

Gas subsidy from forest department | वन विभागाकडून अनुदानावर गॅस

वन विभागाकडून अनुदानावर गॅस

नांदेपेरा : सध्या प्रचंड जंगलतोड होत असल्याने ती थांबविण्याकरिता व जंगलांचे रक्षण करण्याकरिता वन विभाग अनुदानावर ग्रामस्थांना गॅस जोडणी देणार आहे.
जी गावे जंगलाला अगदी लागून आहे, अशा गावातील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे़ ग्रामीण भागात घरी गॅस जोडणी नसल्यामुळे जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्याचा स्वयंपाक व सरपणाकरिता सर्रास वापर करतात. त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने गॅस सिलिंडरसाठी आता अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही, मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही, या अपेक्षेने वन विभागाने ही महत्वपूर्ण योजना आखली आहे़
वन विभागाने दरोगा व वनपाल यांना या योजनेबाबत सूचना दिल्या आहे़ वनपाल गावागावात जाऊन तुम्हाला वन विभागाकडून गॅस जोडणी मिळणार असल्याचे सांगत आहे़ वनपाल यांनी गावात या योजनेची माहिती देताच गॅस जोडणीसाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्याकरिता ग्रामस्थ तहसीलकडे धाव घेत आहे़ जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ही मुख्य कागदपत्रे असल्याने ती मिळण्याकरिता तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने ग्रामस्थांना वेळेत कागदपत्रे गोळा करणे कठीण झाले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Gas subsidy from forest department