शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीसाठी चार लाख शेतकरी पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:52 IST

कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देकृषी क्षेत्रात बदलविदर्भातील शेतकऱ्यांचा पुढाकार

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी तब्बल चार लाख शेतकरी फळबाग लागवडीसाठी पुढे सरसावले आहे. त्यांनी आॅनलाईन प्रक्रियेतून अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार अनुदान देते. त्यासाठी यंदा राज्यातून तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी येत्या काळात विदर्भातील शेती क्षेत्रात बदलाचे चित्र दिसणार आहे. रोपवाटिका, आंबा, डाळींब, साग, आवळा, सीताफळ, बांबू आणि इतर फळ पिकांसाठी शेतकऱ्यांनी या योजनअंतर्गत अर्ज दाखल केले. फळ बाग लागवडीसोभतच जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे, हरितगृह, एकात्मिक शेती साखळी, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन आदींचा या योजनेत समावेश आहे.
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होतील, त्यांना योजनेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा योजनेत समावेश व्हावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. मात्र तेवढे अनुदान उपलब्ध नाही. यामुळे योजनेच्या उद्दीष्टाला मर्यादा आली आहे. या योजनेत सहभाग घेण्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहे. मात्र आता विदर्भातील शेतकरीही जागृत होत आहे. त्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला आहे. आता या शेतकºयांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जादा अनुदान उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील शेतकरी संख्येचे उद्दीष्ट वाढवून मिळावे, अश्ी विदर्भातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट अधिक अर्ज
फळबाग लागवड योजनेसाठी विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जादा अर्ज आले. विदर्भातील बुलडणा ९०००, यवतमाळ ६०००, वाशिम ३७००, अकोला ५०००, अमरावती ५०००, भंडारा ३०००, चंद्रपूर जिल्ह्यातील ६००० शेतकऱ्यांनी अर्ज केले अहे. या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट जादा अर्ज आले. यात सर्वाधिक आघाडीवर अहमदनगर जिल्हा आहे. तेथून तब्बल ६४ हजार अर्ज आले. औरंगाबादमधून ६० हजार, जालना ५६ हजार, नाशिक २६ हजार, सांगली १५ हजार अर्ज आले आहे. यावरून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक जागृत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :agricultureशेती