शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बासरी वाजली... गाई घोंगड्यावर बसल्या...

By admin | Updated: November 2, 2016 00:54 IST

संगीत ही मनाची भाषा आहे. ती कुणालाही कळते. म्हणूनच अशिक्षित गुराख्याने वाजविलेली बासरी त्याच्या गायीला भावते.

शेकडो वर्षांची परंपरा : तरोडा येथील गायगोधनाच्या कार्यक्रमात शेकडो गावकऱ्यांची हजेरी शिवानंद लोहिया  हिवरीसंगीत ही मनाची भाषा आहे. ती कुणालाही कळते. म्हणूनच अशिक्षित गुराख्याने वाजविलेली बासरी त्याच्या गायीला भावते. बासरीच्या सूरांवर अन् डफड्याच्या तालावर गायी मंदिराच्या पायऱ्या चढून जातात... हा मनोज्ञ प्रकार दरवर्षी गायगोधनला तरोडा गावात घडतो. तसा तो यंदाही मंगळवारी घडला.बासरी आणि डफडीच्या तालावर नाचणाऱ्या, बसणाऱ्या आणि मंदिरावर चढणाऱ्या गायींचा हा खेळ अचानक घडत नाही. त्यासाठी खास प्रशिक्षण होते. परिसरातील मांगूळ, तरोडा, गणगाव, साकूर, जवळा, खंडाळा, भांबराजा, वाई, बेलोरा, रूई, हिवरी, वाटखेड, मनपूर, शिरपूर, चाणी कामठवाडा यासह अनेक गावातील शेतकरी, गोपालक त्यात सहभागी असतात. ज्या गुराख्यांनी कधी शाळा पाहिली नाही, ती अशिक्षित माणसं गुरांना मात्र चोख प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणही कशाचे? तर भाषेचे. अन् भाषाही कोणती? तर मनाची ! बासरीने विशिष्ट सूर छेडले की बसायचे, डफडीवर खास थाप पडली की नाचायचे, हे मुक्या जनावरांना कळते. त्यामागे असते गुराख्यांनी घेतलेली मेहनत. अष्टमीपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत गायींना प्रशिक्षण दिले जाते. गुराखी जेव्हा रानात गुरे चारायला नेतो, तेव्हा ते कुरणच प्रशिक्षण शिबिर बनते. हे प्रशिक्षण पाहण्यासाठी गावातील आणि आजूबाजूच्या गावातीलही हौशी गावकरी हजर होतात. अशा तरबेज झालेल्या गायींची नजाकत तरोडा गावात गायगोधनाच्या दिवशी पाहता येते. मंगळवारी हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी तरोडा गावात मोठी गर्दी केली होती. गुराख्याच्या बासरीचा हुकूम मानणारी गाय, हे सख्य पाहताना गावकरीही हरखून गेले. ही शेकडो वर्षांची परंपरा येथे आजही जपली गेली आहे. मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रमिलाताई भेंडेकर, संस्थानचे अध्यक्ष शेषराव भलावी, सचिव राजाभाऊ भोयर, बबन गावंडे, सचिन भोयर, हेमेंद्र अवझाडे यांच्यासह विशेष अतिथी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी प्रशांत कांडलकर आदी उपस्थित होते. तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देवानंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिन भोयर यांनी आभार मानले.