शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडयुक्त पाणी उठले मजुरांच्या जीवावर

By admin | Updated: May 29, 2016 02:34 IST

दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे तालुक्यात शेकडो नागरिकांना किडणीचा आजार जडला आहे.

अनेकांना किडणीचे आजार : तीव्र टंचाईच्या काळात महागाव तालुक्यात दूषित पाण्याची समस्या महागाव : दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे तालुक्यात शेकडो नागरिकांना किडणीचा आजार जडला आहे. अशा रुग्णांमध्ये रोजमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पाणीटंचाईच्या काळात दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आहे. विशेष म्हणजे, किडणीचा आजार जडलेल्या लोकांमध्ये ३० ते ६० वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण दारिद्र्यरेषेखालील यादीत मोडणारे आहे. किडणीच्या आजारावरील महागडा उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे उपचाराविना मरणासन्न अवस्थेत अनेक जण जगत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव-९, पोहंडूळ - ८, काळी दौलत-२१, फुलसावंगी - १६, सवना -२९ अशा प्रकारे किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात रुग्ण संख्या यापेक्षाही अधिक आहे. दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे या आजाराची सुरुवात होत असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी व्यक्त केले आहे. तालुक्यातील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून बहुतांश नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. अशा हातपंपावर प्रतिबंध लावण्यात आला असून पाणी टंचाई असल्यामुळे नागरिक त्याचा सर्रास वापर करीत आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे ज्या गावात सर्वाधिक रुग्ण आढळले तेथे आॅरोचे पाणी पुरविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. पुसद विधानसभेतील परंतु महागाव तालुक्यात येणारे वडद, ब्रह्मी, साई, बोरी या गावात आमदार मनोहरराव नाईक यांच्या आमदार फंडातून आॅरोच्या पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण संख्येत घट झाली आहे. १०० टक्के प्रभावित असलेल्या गावात लोकसंख्येनुसार दोन एटीएम बसविले तरी रुग्ण संख्या कमी होऊ शकते. मात्र पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असतानाही कोणत्याही गावातून एटीएमची मागणी पुढे आली नाही किंवा प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. (शहर प्रतिनिधी)