शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

४५४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी

By admin | Updated: November 16, 2014 22:53 IST

जिल्ह्यातील ४५४ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असून ३७७ लोकांना दातांचा तर ८३ लोकांंना हाडाचा फ्लोरोसीस असल्याचे खळबळजनक वास्तव पुढे आले आहे. पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर

राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रातून वास्तव उघड ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ जिल्ह्यातील ४५४ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असून ३७७ लोकांना दातांचा तर ८३ लोकांंना हाडाचा फ्लोरोसीस असल्याचे खळबळजनक वास्तव पुढे आले आहे. पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच ही बाब उघड झाली आहे. फ्लोरोसीसग्रस्त लोकांच्या हक्कासाठी सहयोग ट्रस्टद्वारा दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण उमलकर यांनी प्राधिकरणासमोर सदर प्रतिज्ञापत्र सादर केले. सदर प्रतिज्ञापत्र ५२ पानांचे असून त्यात विविध अहवाल जोडलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, महागाव, मारेगाव, नेर, पांढरकवडा, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ आणि झरी जामणी या तालुक्यांमध्ये फ्लोरोसीसचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात अनेकांना दाताचे आणि हाडाचे गंभीर आजार झाले आहे. अनेकांचे पाय वाकडे झाले असून जगणेही कठीण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील साधारणत: ३७७ लोकांना दाताचा फ्लोरोसीस आणि ८३ जणांना हाडाचा फ्लोरोसीस हा आजार जडल्याचे वास्तव या प्रतिज्ञा लेखातून पुढे आले आहे. एकट्या घाटंजी तालुक्यात ६७ लोकांना दातांचा फ्लोरोसीस झाल्याचे पुढे आले. बाभूळगाव तालुक्यात ११ लोकांना सदर आजाराची लागण झाली आहे. आजही प्रशासन स्वच्छ आणि फ्लोराईडमुक्त पाणी देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जमिनीतून बेकायदेशीरपणे भूजल उपसा करून त्याचा व्यापारी उपयोग करण्यावर कडक निर्बंध अमलात आणावे, असे आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने यापूर्वीच पारित केले आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची चणचण आणि पिण्याच्या पाण्याची टंचाईची गंभीर दखल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ.अजय देशपांडे यांनी घेतली आहे. दूषित व फ्लोराईडयुक्त पिण्याचे पाणी सामान्य नागरिकांचे आरोग्य अधिकार व पाण्याची तस्करी यासंदर्भात सहयोग ट्रस्टद्वारा याचिका दाखल करण्यात आली होती. फ्लोरोसीसग्रस्त लोकांच्या हक्कासाठी अ‍ॅड. असीम सरोदे व सामाजिक न्यायासाठी कार्यरत ११ वकिलांनी दाखल केलेल्या केसमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे गंभीर वास्तव पुढे आले आहे. फ्लोरोसीसमुळे आजारग्रस्त लोकांबद्दल प्रसार माध्यमातून माहिती पुढे आली. मात्र प्रशासनातील सर्व व्यवस्थांचे व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाचे याकडे दुर्लक्ष आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने मात्र या प्रकरणाची दखल घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने युनिसेफचा मोठा आर्थिक निधी फ्लोरोसीससाठी लढा देण्यासाठी वापरला. परंतु २०१२ मध्ये एक हजार ७५८ एवढी फ्लोरोसीसग्रस्त लोकांची संख्या आज वाढल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. केवळ विदर्भातच त्यावेळी एक हजार ११ फ्लोरोसीसग्रस्त लोक सापडल्याची माहिती याचिकेतून देण्यात आली.