शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: October 3, 2015 02:20 IST

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यवतमाळ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संतोष पाटील, संदीप महाजन, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रातचांदणा येथील शेतकरी अरविंद बेंडे, जरूर ता. घाटंजी येथील विजय जोगी, झाडगाव ता. राळेगाव येथील गजानन निवल, कोठा ता. कळंब येथील केशव निमकर, खापरी ता. घाटंजी येथील संजय गोडे या प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगतीशिल शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आधुनिक पध्दतीने शेती करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा, असे सांगितले. यावेळी शेतकरी अरविंद बेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार दिलीप झाडे यांनी केले. सूत्रसंचालन मंडळ अधिकारी एकनाथ बिजवे यांनी केले. तर आभार तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनी मानले. शेतकरी दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी कार्यालयातील विभा घोडे यांच्यासह कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)