शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांकडून फटाके, पेढय़ांचे बुकिंग

By admin | Updated: May 15, 2014 23:58 IST

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निकालाचे बॅन्ड काही तासातच वाजणार आहे. खासदार हंसराज अहीर व अँड.वामनराव चटप दोघांच्याही कार्यकर्त्यांना विजयाची प्रचंड

ंवणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निकालाचे बॅन्ड काही तासातच वाजणार आहे. खासदार हंसराज अहीर व अँड.वामनराव चटप दोघांच्याही कार्यकर्त्यांना विजयाची प्रचंड खात्री असल्याने त्यांच्या चाहत्यांनी फटाके व पेढय़ांचे बुकिंग करून ठेवले असून कुणाचा विजय होणार, यावर लाखो रूपयांच्या अनेक शर्यर्तीसुध्दा लागल्या आहेत.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील जनता व कार्यकर्त्यांंची दीड महिन्याची प्रतीक्षा आता काही तासातच संपणार आहे. कोण कुठे अधिक चालला, कुणाला कुठे किती लीड मिळणार, २00९ च्या परिस्थितीत कसा बदल होणार, एखाद्या विधानसभा मतदार संघातील ‘घट’ दुसर्‍या विधानसभा मतदार संघात कशी भरून निघणार, यांच्या चर्चा गेला दीड महिना रंगल्या. ‘एक्झिट पोल’मध्ये ‘आप’ला विदर्भातील एक जागा दाखविण्यात येत असल्याने शेतकरी संघटना व आपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. विविध वाहिन्यांनी एक्झिट पोलमध्ये दाखविलेली आपची विजयी जागा चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघाचीच असू शकते, असे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात थोडी अस्वस्थता पसरली असली तरी, हंसराज अहीर यांचा विजय पक्का असल्याचा विश्‍वासही दाखविण्यात येत आहे. ‘काट्या’ची लढत होण्याची चिन्हे आहे. राजुरा, वरोरा, बल्लारशा या तीन विधानसभा मतदार संघात चटप आघाडी घेतील, अशी चर्चा रंगत आहे. वणी विधानसभा मतदार संघात यावेळी अहीर यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जात आहे. पांढरकवडा-आर्णी विधानसभा मतदार संघात चटप खूपच मागे राहील, अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे त्यांची पूर्वेकडील लीड मतदार संघाच्या पश्‍चिम भागात प्रचंड दरी निर्माण करेल, अशी चर्चा जोरात सुरू आहे. ‘झाडू’ हाती घेतल्याची चर्चा आहे. परिणामी चटप व अहीर, या दोन्ही तंबूमध्ये विजयाचा प्रचंड आत्मविश्‍वास उफाळून आला आहे. काही विधानसभा मतदार संघात ‘जात फॅक्टर’ने चटपांना उचलून धरले आहे. कुणबी समाज बहुतांश चटपांच्या पाठीशी राहील, असे सांगितले जात आहे. मागीलवेळी त्यांचा पराभव झाल्याने सहानुभूती म्हणून यावेळी तरी चटपांना संसदेत पाठवायचेच, असाही कल काही ठिकाणी आढळून आल्याचे बोलले जात आहे.‘लाल दिवा’ येणारच असाही सूर उमटत असल्याने व अहीर यांचा दांडगा जनसंपर्क, या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची ‘हॅटट्रीक’ होणारच, असा विश्‍वास भाजपा गोटात आहे. त्यांनी उघडकीस आणलेला कोळसा महाघोटाळा, केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी देऊ शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. ‘एक्झिट पोल’चा मोदी कल बघता काँग्रेस गोटात स्मशान शांतता दिसून येत आहे. मात्र लोकसभेच्या निकालाचा परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर नक्कीच होणार आहे. त्यामुळे वामनराव कासावारांना आतापासूनच घामाघूम होण्याची वेळ आली आहे. निकालानंतर कार्यकर्ते गावनिहाय मतदान मिळवून त्याचे विश्लेषण करतील. कोणत्या गावचा कार्यकर्ता किती पाण्यात आहे, ते शुक्रवारी स्पष्ट होणारच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

मात्र गेल्या दोन दिवसांत दाखविण्यात येत असलेल्या

मतदारांच्या अंदाजानुसार हंसराज अहीर व वामनराव चटप यांच्यामध्ये

मतदारांच्या एकंदरीत चर्चेमध्ये कॉंग्रेसचे संजय देवतळे यांना तिसर्‍या क्रमांकावर फेकले जात आहे. कारण काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांंनीही यावेळी पक्षनिष्ठा दूर सारून

विद्यमान खासदार हंसराज अहीर यावेळी विजयी झाले, तर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चंद्रपूरच्या वाट्याला

लोकसभा मतदार संघातील दलित, आदिवासी व मुस्लीम मतांचे यावेळी ध्रुवीकरण झाल्याने देवतळेंचे देऊळ पाण्यात असल्याचे खुद्द काँग्रेस गोटातूनच बोलले जात आहे. मात्र वणी विधानसभा मतदार संघातून जर देवतळे माघारले, तर हा त्यांचा पराजय नसून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांचाच पराजय ठरणार आहे. सर्व वाहिन्यांवरील