शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

गरोदर मातांसाठी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृवंदन योजना जाहीर करण्यात आली. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गत दोन वर्षामध्ये या योजनेमध्ये ५१ हजार ३८५ महिलांची नोंद करण्यात आली. यातील ४० हजार २९५ महिला मदतीस पात्र ठरल्या आहेत. ३६ हजार ८८० महिलांच्या खात्यात हा निधी वळता झाला आहे. या गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा करते.

ठळक मुद्देसुरक्षित मातृत्वाला मिळाला आधार : लॉकडाऊन काळात बुडीत मजुरीने तारले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृवंदन योजना हाती घेण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ४० हजार महिलांची प्रसूती झाली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात ही मदत मोलाची ठरली आहे.गरोदर मातांसाठी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृवंदन योजना जाहीर करण्यात आली. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गत दोन वर्षामध्ये या योजनेमध्ये ५१ हजार ३८५ महिलांची नोंद करण्यात आली. यातील ४० हजार २९५ महिला मदतीस पात्र ठरल्या आहेत. ३६ हजार ८८० महिलांच्या खात्यात हा निधी वळता झाला आहे. या गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा करते. यामध्ये पहिल्या टप्प्यात गरोदर असल्याची नोंद करताच आरोग्य विभाग गरोदर मातांना हजार रूपये अदा करते. दुसऱ्या टप्प्यात गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी गरजेची आहे. अशी तपासणी झाल्यानंतर गरोदर मातांना दोन हजार रूपयांचा निधी दिला जातो. तर तिसऱ्या टप्प्यात प्रसूतीनंतर लसीकरण केल्यावर दोन हजाराचा अखेरचा टप्पा दिला जातो.गरोदर मातांनी प्रसूतीसाठी आशा अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी करावी लागते. या योजनेत सर्वच स्तरातील महिलांचा सहभाग वाढत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात मोहीम राबविली जात आहे.- पौर्णिमा गजभिये, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, प्रधानमंत्री मातृवंदन योजनालॉकडाऊनमध्ये मोलाचा आधारकोरोना काळात मजुरीच नसल्याने अनेक कुटुंब अडचणीत होते. अशा स्थितीत प्रसूतीमुळे कुटुंबीय चिंतेत होते. मातृवंदन योजनेमुळे प्रसूतीसाठी निधी मिळाला आणि कुटुंबाचा आर्थिक अडसर दूर झाला आहे.बाळाचा मृत्यू झाला तर मदत थांबणारप्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत प्रसूती झाल्यावर दोन हजाराचा हप्ता दिला जातो. मात्र या प्रसूतीत बाळ दगावले तर हा निधी मिळत नाही. दुसºया अपत्याच्या वेळी तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार मिळतात.

टॅग्स :government schemeसरकारी योजना