शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रकाश देवसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नाईक घराण्यावरही तीव्र शब्दात

उमरखेड (कुपटी) : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नाईक घराण्यावरही तीव्र शब्दात टीका केली. वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांचे गेल्या काही दिवसांपासून तळ्यात की मळ्यात सुरू होते. त्यांचा उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्यांची कोंडी झाली होती. म्हणून यावेळी त्यांनी पुसद मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. म्हणून त्यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. २ सप्टेंबर रोजी त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच देवसरकरांनी राष्ट्रवादी सोडण्याची तयारी केली. अखेर मंगळवारी उमरखेडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी गळ्यात भगवा दुप्पटा घालून शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले. १२ सप्टेंबर रोजी मुंबईत आपला शिवसेनेत अधिकृत प्रवेश होणार असल्याचे प्रकाश देवसरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. देवसरकर यांनी राष्ट्रवादी सोडताना शरद पवार, अजित पवार, मनोहरराव नाईक या नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी वेळोवेळी अपमान केल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)