लाऊडस्पीकर वाजविण्यावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:52+5:302021-09-22T04:46:52+5:30

फुलसावंगी : गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. अनेक जण जखमी ...

Fighting over loudspeakers | लाऊडस्पीकर वाजविण्यावरून हाणामारी

लाऊडस्पीकर वाजविण्यावरून हाणामारी

Next

फुलसावंगी : गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. अनेक जण जखमी झाले असून या प्रकरणात पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

येथील भीकू नाईक तांडा परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. विसर्जन मिरवणूक सुरू असताना दिनेश उल्हास राठोड (२५) याने लाऊडस्पीकर लावण्याची मागणी केली. या कारणातून वाद वाढला. प्रकरण मारामारीवर पोहोचले. दिनेश राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोपाल ताराचंद राठोड व अन्य १४ जणांवर गुन्हे दाखल केले. तर दुसऱ्या गटाकडून विश्वनाथ पांडुरंग आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव आडे व अन्य ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, १८८, ५०४, ५०६ यासह मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे नोंदविले. अधिक तपास ठाणेदार विलास चव्हाण, जमादार निलेश पेंढारकर करीत आहे.

Web Title: Fighting over loudspeakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.