शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांची एसपी कार्यालयावर धडक

By admin | Updated: September 24, 2014 23:43 IST

लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नारकुंड व बोरजई या गावांमध्ये कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही.

यवतमाळ : लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नारकुंड व बोरजई या गावांमध्ये कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी थेट पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक दिली. तिवसा गावामध्ये दारूबंदी करण्यात आली. बोरजईमध्ये दारूविक्री हद्दपार झाली. यानंतरही या गावांना लागून असलेल्या नारकूंडमध्ये अवैधरित्या दारू बनविली जाते आणि विकलीसुद्धा जाते. यातून दारूबंदी करणाऱ्या गावांना मोठा फटका बसत आहे. दारूबंदी झालेल्या गावातील नागरिक याठिकाणी दारू पिण्यासाठी येतात. परिणामी दारूबंदीचा तिळमात्रही फायदा झाला नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. यातून गावांमध्ये व्यसनाधिनता वाढून भांडणे आणि हाणामारीच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झाल्याची माहिती या गावांमधील महिलांनी दिली. तसेच शालेय विद्यार्थीसुद्धा व्यसनांच्या आहारी जात असल्यामुळे भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत त्वरित कारवाई करून या परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीचे निवेदन महिलांनी अपर पोलीस अधिक्षक जानकीराम डाखोरे यांना दिले. यावेळी पार्वताबाई खोपरे, मंदा लडके, तुळसाबाई गारपगारे, कमलाबाई डेहनकर, वंदना पारधी, कवडी मुरझडे, बायजा खडसे, मिरा देवकर, निर्मला चिरबंदे, नावला घोटेकर आदींसह असंख्य महिलांची उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)