शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन वाहन चालकांमुळे भय

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

बेजबाबदार वर्तनाने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे अल्पवयीन वाहन चालक रस्त्याने वाहने हाकलत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे़ ते सुसाट वेगाने ‘धूम’ ठोकून

पोलिसांचे दुर्लक्ष : अपघाताची भीती वाढलीनांदेपेरा : बेजबाबदार वर्तनाने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे अल्पवयीन वाहन चालक रस्त्याने वाहने हाकलत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे़ ते सुसाट वेगाने ‘धूम’ ठोकून वाहने चालवतात. त्यामुळे इतर वाहनधारकांनाच भय निर्माण झाले आहे.अल्पवयीन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे कुठलाही वाहन चालक परवानाही नसतो. तरीही ते छातीठोकपणे शहरासह ग्रामीण भागात वाहन चालवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ त्यांच्या सुसाट वेगाने इतर वाहन चालकांच्या हृदयाची धडपड वाढली असून त्यांच्यात भितीही निर्माण झाली आहे़ सुसाट वाहन पळवणाऱ्या अल्पवयीन वाहन चालकांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे़ ही अल्पवयीन मुले निर्धारित वेगापेक्षा जादा वेगाने वाहन चालवितात. ते दुसऱ्यांच्या जिवाची पर्वाच करीत नाही़ ते समोरच्या वाहनाला क्षणात ‘कट’ मारून भरधाव वेगाने निघूनही जातात़ हल्ली आॅटोरिक्षाही असे अल्पवयीन चालकच हाकलत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅटोरिक्षाच्या अपघातांमध्येही वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. आॅटोरिक्षा चालक ही ग्राहक मिळविण्याच्या उद्देशाने आपले वाहन आडवे-तिडवे रस्त्यामध्ये उभे करतात़ या सर्व प्रकाराकडे वाहतूक पोलीस निमूटपणे बघतात. काही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस रस्त्यात वाहन चालकांची चौकशी करतात. मुले घरून वाहन घेऊन निघतात. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसतो. मात्र पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी मुले वचरढ होतात. त्यांना वाहन चालविण्यात मजा येते. ही मजा अपघातासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहन देणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.अशा अल्पवनीय वाहन चालकांमुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र तरीही त्यांनी कठोरपणे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा शहर व ग्रामीण भागात अल्पवयीन वाहन चालकांमुळे दुसऱ्याचा नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)