भरधाव ट्रेलर बँकेच्या रांगेत शिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:41+5:30

ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो निंबाच्या झाडावर धडकून बँकेसमोर लागलेल्या रांगेत शिरला. यात रांगेतील सात महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.

Fastrunning trailer entered the bank queue | भरधाव ट्रेलर बँकेच्या रांगेत शिरला

भरधाव ट्रेलर बँकेच्या रांगेत शिरला

ठळक मुद्देजोडमोहाची घटना : निंबाच्या झाडावर धडक, सात जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन यवतमाळ मार्गे जात असलेल्या ट्रेलरला जोडमोहा येथे अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो निंबाच्या झाडावर धडकून बँकेसमोर लागलेल्या रांगेत शिरला. यात रांगेतील सात महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.
अरुण हरदलाल विश्वकर्मा (५०) रा. चंद्रपूर हा पांढरकवडावरून ट्रेलर (क्र.एमएच-३५ के-६६२५) घेऊन यवतमाळकडे जात होता. त्याचे जोडमोहा येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रेलरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरात धडक दिली. यात ते झाड जमीनदोस्त झाले. तसेच बँकेसमोर उभ्या असलेल्या दुचाकी व पानटपरीचा चुराडा झाला. शुभांगी ठाकरे (३२), श्रावण सोनोने (२१), सीताराम उईके (५५), मुक्ताबाई उन्हाळे (५५), प्रमिला व्यवहारे (५०), नानीबाई कोडापे, लक्ष्मी मेश्राम सर्व रा. बेलोरी हे जखमी झाले. हे सर्व जण बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. धावपळीत हे सात जण किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जमादार राजू आडे यांनी भेट दिली.

Web Title: Fastrunning trailer entered the bank queue