शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे.

ठळक मुद्देखरिपातील पेरणीसाठी पैशाची तजवीज : बाजार समित्या हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा तोंडावर येवून पोहोचला आहे. तत्पूर्वी पेरणीची तजवीज करण्यासाठी राखून ठेवलेले धान्य शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढले आहे. यातून बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर हातात पडणारी दरवाढ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरवर्षी शेतकरी पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवतात. दर वाढण्याची शक्यता असणाऱ्या धान्याचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण गणितच बिघडले आहे. कुठल्याही धान्याची दरवाढ झाली नाही, उलट शेतमालाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे. हरभराच्या बाबतीतही असेच घडले आहे. हरभऱ्याचे दर ३४०० ते ३६०० पर्यंत स्थिर राहिले आहे. तुरीच्या दरानेही शेतकऱ्यांना दगा दिला. ४७०० ते ५२०० रुपये क्ंिवटल दराने तुरीची खरेदी होत आहे. गव्हाचे दर १६०० ते १७०० रुपये क्ंिवटलपर्यंत मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र दरवाढ मिळाली नाही, उलट वजन घटल्याने शेतकऱ्यांना कमी पैसे आणि कमी दर शेतमाल विकून हातात आला आहे. या पैशांवर शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे.पावसाचा अंदाज आणि गर्दीचा ओघहवामान विभागाने ११ ते १५ जून या कालावधीत पावसाचा जोर राहणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा सुरक्षित लिलाव करता यावा यासाठी पुरेशे शेड उपलब्ध नाहीत. यामुळे बाजारात धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमाल संरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी