शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: October 14, 2016 03:09 IST

सॅम्पल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविल्यानंतर ठरलेला भाव न देता शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार : शेतकऱ्यांशीच घातला जातो वाद महागाव : सॅम्पल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविल्यानंतर ठरलेला भाव न देता शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध महागाव ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दहा क्ंिवटल सोयाबीन व्यापाऱ्यांनी स्वत:च ठेऊन घेतले आणि शेतकऱ्यांना हाकलून लावले, असा प्रकार गुंज येथे घडला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.वेणी येथील शेतकरी जयराम रामचंद्र जाधव यांनी गुंज येथे सोयाबीन विक्रीकरिता आणला होता. भुसार मालाचे खासगी व्यापारी विठ्ठल पुंंड यांनी २२०० रुपये भाव देऊ केला. माल खाली करून घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी १८०० रुपये भाव दिला. ठरलेला भाव का दिला नाही असे शेतकऱ्यांनी विचारले असता व्यापाऱ्याने शेतकऱ्याशी हुज्जत घालून आपला माल परत घेऊन जा असे सुनावले. सदर शेतकऱ्यांची दोनही मुले आजारी आहेत. त्यामुळे त्याला पैशाची तीव्र गरज आहे. याच मुळे त्याने आपला माल विक्रीला काढला परंतु व्यापाऱ्यांकडून फसवणूक करण्यात येत आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयावर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. गुंजपासून संपूर्ण तालुक्यात अशा खासगी भुसार माल खरेदीदार व्यापाऱ्यांचे जाळेच पसरले आहे. माल खाली करून घेतल्यानंतर भाव कमी दिला जातो. प्रशासकाने याकडे लक्ष देऊन संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)