शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावर पीककर्जाच्या नोंदीने शेतकरी संतप्त

By admin | Updated: May 14, 2016 02:18 IST

एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाचा शेतकऱ्यांच्या सातबारावर बोझा चढवू नये, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेचे आदेश थंडबस्त्यात : सहकार-राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संभ्रमयवतमाळ : एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाचा शेतकऱ्यांच्या सातबारावर बोझा चढवू नये, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात पीक कर्ज वाटणाऱ्या सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी सातबारावरील कर्जाची नोंद कायम ठेवली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरच बँकांमधील हा संभ्रम दूर होणार आहे.जिल्ह्यातील पीक कर्ज घेणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांचा कर्जाचा आकडा एक लाखात असतो. अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक कर्जाची नोंद करू नये, असे आदेश रिझर्व्ह बँकेने ११ मे २०१२ रोजी दिले होते. या आदेशाची लगतच्या परभणी, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. यवतमाळ जिल्हा मात्र सध्या तरी त्याला अपवाद ठरल्याचे दिसते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँका आणि राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या सातबारावर एक लाखापर्यंतच्या कर्जाची स्पष्टपणे नोंद करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सांगितले की, सध्या तरी सातबारावर एक लाखापर्यंतच्या कर्जाची-बोझाची नोंद केली जात आहे. मात्र त्यासाठी कोणताही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना पडत नाही. ही नोंद घ्यावी किंवा कसे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळण्याची प्रतीक्षा आहे. एक लाखापर्यंतच्या कर्जाची नोंद सातबारावर न करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून तलाठ्यांना दिले गेल्याची माहिती असली तरी बँकेपर्यंत अद्याप तसे कोणतेही आदेश पोहोचले नसल्याचे जिल्हा बँकेतून स्पष्ट करण्यात आले. लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सातबारा कोरा ठेवल्यास त्यावर पुन्हा कर्ज घेतले जाण्याची आणि बँकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. तसे प्रकार बुलडाण्यासह काही ठिकाणी झाले आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणताही बोझा न चढविता केवळ पीक कर्ज असल्याबाबतची नोंद सातबारावर राष्ट्रीयकृत बँकांमार्फत केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राष्ट्रीयकृत बँका अद्याप १७५ कोटीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप पैशाअभावी थांबले आहे. राज्य सहकारी बँकेकडून २३० कोटींचे कर्ज मंजूर झाल्यानंतरच जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. इकडे राष्ट्रीयकृत बँकांचेही कर्ज वाटप अद्याप १७५ कोटी रुपयातच अडकले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना १८०० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित करून दिले आहे. मात्र सध्या हे कर्ज वाटप अवघ्या १० ते १५ टक्के असल्याचे दिसून येते. राष्ट्रीयकृत बँकांचा पीक कर्ज वाटपाचा आकडा दर दिवशी कोटीने वाढत असून शासनाच्या निर्देशानुसार एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.