हमी केंद्रातील ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदरात शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र उघडले जाणार ...

Expiration of Online Registration at Guarantee Center | हमी केंद्रातील ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ

हमी केंद्रातील ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार नोंद : सरासरी उत्पादनावर खरेदीचे सूत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदरात शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र उघडले जाणार आहे. या केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आपली नोंद करता येणार आहे. सरासरी उत्पादनाच्या आधारावर ही खरेदी केली जाणार आहे.
जिल्ह्यात राज्य फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्र्र्र्र्र्र्केटींग फेडरेशनच्या नेतृत्वात ११ हमी केंद्र उघडले जाणार आहे. तसे प्रस्ताव मार्केटींग फेडरेशन आणि व्हीसीएमएसकडे आले आहेत. यामध्ये पुसद, महागाव, आर्णी, वणी पांढरकवडा आणि बाभूळगाव हे केंद्र राज्य फेडरेशनकडे असणार आहेत. यवतमाळ, मुकुटबन, राळेगाव, उमरखेड, घाटंजी ही केंद्रे विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे राहणार आहे. या ११ केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. या केंद्राची मुदत संपली होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
मूगाकरिता ३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, तर सोयाबीन आणि उडीद पिकाकरिता शेतकºयांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपली नोंदणी नोंदविता येणार आहे. याकरिता सातबारा आणि पेरणी क्षेत्राची अट बंधनकारक केली आहे. शेतमालाच्या उत्पादनाच्या सरासरी उत्पन्नानुसार ही खरेदी केली जाणार आहे.आीनलाईन नोंदणीनंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कार्यक्षेत्रानुसार ऑनलाईन नोंदणी करा
निवडणुकीच्या काळात तलाठी नसल्याने सातबारा मिळणे अवघड झाले आहे. अशात मुदत संपल्याने शेतकरी संकटात सापडले होते. आता शेतमाल खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांचा पेच संपला आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रानुसार शेतकºयांना शेतमालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

Web Title: Expiration of Online Registration at Guarantee Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती