शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात डझनावर वाघांचे अस्तित्व

By admin | Updated: January 30, 2016 02:40 IST

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील टिपेश्वर अभयारण्यामध्ये (ता. पांढरकवडा) डझनावर वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे.

पांढरकवडा येथील पर्यटकांना व्याघ्र दर्शन : टायगर प्रोजेक्टचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा, पर्यटक वाढले
यवतमाळ : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील टिपेश्वर अभयारण्यामध्ये (ता. पांढरकवडा) डझनावर वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. हे वाघ पर्यटकांना अभयारण्यात येण्यासाठी खुणावत आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून टिपेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
१४८ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यात यंदाच्या व्याघ्र गणनेत ट्रॅप कॅमेरांमध्ये नऊ वाघांचे अस्तित्व नोंदविले गेले. मात्र कॅमेरापुढे न आलेले आणखी काही वाघ अभयारण्यात असण्याची शक्यता आहे. वन खात्याची यंत्रणा मात्र वाघांचा शोध घेण्याचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने वाढीव वाघांचे अस्तित्व नाकारत आहे. अभयारण्या बाहेर लगतच्या झरी तालुक्यातसुध्दा आठ ते नऊ वाघांचे अस्तित्व आहे. हे वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्प किंवा तेलंगणा राज्यातून आलेले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. वाघांच्या या अस्तित्वामुळे झरी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघांच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला. वाघांनी अनेक पाळीव जनावरांचाही फडशा पाडला.
एकीकडे टिपेश्वर अभयारण्यामध्ये व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तर दुसरीकडे झरी तालुक्यात याच व्याघ्र दर्शनाने नागरिकांची बोबडी वळते आहे. वाघाच्या भीतीने अनेकांनी भल्या पहाटे आणि सायंकाळी शेतात जाणेही टाळले आहे. पूर्वी टिपेश्वरमध्ये केवळ दोन वाघ होते. आता ही संख्या नऊ वर गेली आहे. भविष्यात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. झरी तालुक्यात वावरणारे वाघही टिपेश्वरमध्ये आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा (टायगर प्रोजेक्ट) दर्जा मिळावा अशी पर्यटकांची मागणी आहे. वर्धा-नागपूर जिल्हा सीमेवरील बोर अभयारण्याला अवघ्या चार वाघांच्या अस्तित्वावर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला असताना टिपेश्वरला विलंब का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

तीन वाघांनी घेरले
पांढरकवडा येथील अभय डोंगरे, भूषण इसासरे, प्रवीण नंदनकर, वनपाल अक्कुलवार यांना गुरुवारी सायंकाळी ४ वाजता हापशी पॉर्इंटवर तीन वाघांनी सुमारे सव्वातास घेराव घातला. वाहनात असल्याने हे पर्यटक बचावले. मात्र वाघांनी त्यांना जागेवरून हलूही दिले नाही.