शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

५०० बेडचे स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर यासह अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी हे कोरोना रुग्णालय राहणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : वाशिमच्या रुग्णांवरही उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारण्यात येत आहे. ५०० बेडची व्यवस्था या रुग्णालयात असणार आहे. व्हेंटीलेटरसह सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय दहा दिवसात उभे केले जात आहे. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संयुक्त बैठक घेतली.शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर यासह अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी हे कोरोना रुग्णालय राहणार आहे. वाशिमच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स व नर्सेसचा ५० टक्के स्टाफ व यवतमाळ मेडिकलमधील डॉक्टर मिळून ६०० जणांची टीम तयार केली आहे. एका युनिटमध्ये ३० बेड असून १४ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम राहणार आहे. गरज पडल्यास खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी आयएमएसोबत बैठक घेतली आहे.पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णालयात मास्क, सॅनिटायझर्स, कोरोना किटच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली. शासकीय रुग्णालयात एन-९५ मास्क चार हजार १५०, थ्री लेअर साधा मास्क ३२ हजार ७००, कोरोना किट ९५ उपलब्ध असल्याचे डॉ.मिलिंद कांबळे यांनी सांगितले. सॅनिटायझर उपलब्ध नसून डॉक्टर साबणाचा वापर करत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी १६ उपजिल्हा रुग्णालय व ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोनाच्या १५० किट, सॅनिटायझरच्या १७०० बॉटल, थ्री लेअर मास्क ३५ हजार उपलब्ध असल्याचे सांगितले.मास्क व सॅनिटायझरच्या खरेदीबाबत सूक्ष्म नियोजन करू. त्याची मागणी तत्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर व वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी येत्या दहा दिवसात उर्वरित खाटांच्या रुग्णालयासाठी लागणारी सेवा तातडीने पूर्ण केली जाईल, असे सांगितले. बैठकीला डॉ.बाबा येलके, डॉ.संजय भारती, डॉ.गिरीष जतकर, डॉ.श्रीकांत वºहाडे यांच्यासह पराग पिंगळे, विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते.खासगी डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेणारयवतमाळ आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजीव जोशी यांच्याशी चर्चा केली असून त्यांना खासगी रुग्णालय सुरू करण्याबाबत निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठकीत दिली. खासगी डॉक्टरांच्या अडचणीसुद्धा जाणून घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या डॉक्टरांकडून सॅनिटायझर, मास्क व काही कोरोना कीटची मागणी करीत आहे. मात्र या सुविधा प्रशासनाकडून त्यांना पुरविणे सध्या शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल