शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्यांना अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी

यवतमाळ : लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांना आॅईल लावून ठेवले जाते. जेणे करून त्यावर कुणीही बसणार नाही. ही बाब वारंवार संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडूनही कुठलीही कारवाई केली जात नाही. निवाऱ्याच्या अगदी बाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकानदारी थाटली आहे. निरूपयोगी वस्तू या निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकून दिल्या जातात. त्याच्या दुर्गंधीमुळे निवाऱ्याजवळ थांबणाऱ्या नागरिकांचा जीव कासावीस होतो. त्यामुळे ते सुस्थितीत असलेल्या प्रवासी निवाऱ्याऐवजी भर पावसात बाहेर थांबून बसची प्रतीक्षा करतात.अमरावती, दारव्हा मार्गावर धावणाऱ्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा उन्ह, पावसापासून बचाव व्हावा यासाठी दारव्हा नाक्यावर उत्कृष्ट दर्जाचे दोन प्रवासी निवारे उभारण्यात आले आहे. जवळपास नागरिक याचा उपयोगही घेतात. शिवाय, या मार्गावर असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा स्कूल बस आदी वाहनांची प्रतीक्षा या ठिकाणी बसून करतात. परंतु अलीकडे या निवाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. या निवाऱ्याच्या मागील बाजूस काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. काहींनी तर निवाऱ्याच्या अगदी बाजूला आपला व्यवसाय थाटला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी होणारी गर्दी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विविध प्रकारचे शिल्लक राहिलेले खाद्य पदार्थ निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकले जाते. पावसामुळे कुजलेल्या या पदार्थाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. ही बाब जागरूक नागरिकांनी संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली. परंतु सुरुवातीपासूनच सहकार्याविषयी नकारात्मक भूमिका घेतलेल्या एसटी महामंडळाने ही बाबही फारशी गांभीर्याने घेतली नाही. प्रवासी निवारा नियमित स्वच्छ राहावा, यासाठी महामंडळाला पत्र देण्यात आले होते. मात्र त्यांनी हात वर केले. आता अतिक्रमणात सापडलेले प्रवासी निवारे मुक्त करावे, यासाठी नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यालाही ठोकरण्यात आले. दारव्हा, नेर, अमरावती मार्गाने धावणाऱ्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. लांब पल्ल्याच्या जसे औरंगाबाद, पुणे, बीड, अकोला, परतवाडा, शेगाव, सोलापूर, शिर्डी आदी बसने प्रवास करणारे नागरिकही या प्रवासी निवाऱ्यात बसची प्रतीक्षा करत थांबतात. त्यांना अतिक्रमणधारकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. संबंधितांनी गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)