शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बसणार ‘डायट’च्या वर्गात

By admin | Updated: August 23, 2015 02:35 IST

प्रशासन गतिमान करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

प्रशिक्षण : गतिमान प्रशासनासाठी नवा प्रयोगयवतमाळ : प्रशासन गतिमान करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. आता या संस्थेवर शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गतीमान प्रशासनासाठी कर्मचाऱ्यांचा कामाप्रती असलेला दृष्टिकोन बदलविण्यावर भर दिला जाणार आहे. सद्यस्थितील शासकीय कार्यालयातील शिपाई, कर्मचारी, अधिकारी काम अडविण्यासाठी बसले आहेत की काय असे दिसते. अगदी लहानसहान बाबी पुढे करून अथवा नियमांचा बागुलबुवा करून सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबित ठेवली जातात. यालाच छेद देण्यासाठी शासनाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी यशदा पुणेकडून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर अमरावती येथील विभागीय प्रबोधणीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र याठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय नाही. शिवाय जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षणासाठी बोलाविणेही अशक्य आहे. त्यामुळे शासनाने आता शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवरच कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. पहिल्या टप्प्यात २०११ पूर्वी शासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा फायदा पदोन्नती आणि इनक्रीमेंट वाढण्यासाठी होणार आहे. शिवाय नव्याने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. काम घेऊन आलेल्या व्यक्तीसोबत कशी वर्तणूक ठेवावी, नियमित काम केल्याचा कोणता फायदा होते, याचेही धडे दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण प्रशिक्षण संस्थेत त्याच जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांचे निवासी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ८२ विभागांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची यादी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)