शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी चिंतेत, तर नागरिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:37 IST

महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपावरून ६५ दिवस ओलांडून गेले आहेत. या काळात कर्मचारी वर्गही चिंतेत पडला आहे. महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

आतापर्यंत ३१५ निलंबित

संपात सहभागी झालेल्या यवतमाळ विभागातील ३१५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय १०६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ९८ जणांची बदली झाली आहे.

आता लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे

दोन महिन्यांपासून पगार नाही. आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता लक्ष न्यायालयाकडे आहे. आम्हाला न्याय मिळेल.- गणेश शेंडगे, वाहक

आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. बसेस बंद असल्याने नागरिकांनाही त्रास होत आहे.- गीता श्रीवास, वाहक

एसटीनेच सुरक्षित प्रवास

एसटी बस नसल्याने दुचाकी व इतर साधनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. एसटी बस सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे. ती लवकर सुरू व्हावी.- दीपक रामटेके, प्रवासी

कार्यप्रसंगासाठी खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बस सुरू झाल्यास एकट्यालाही प्रवास करणे सोयीचे जाते. - धीरज भोयर, प्रवासी

दिवसभरात २०४३ जणांचा एसटीने प्रवास- यवतमाळ विभागातील सात आगारामधून मंगळवारी एसटी बसेस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २०४३ जणांनी प्रवास केला. - यवतमाळ विभागातील पुसद आणि उमरखेड या दोन आगारातून मंगळवारी एकही बसफेरी सुटली नाही. दारव्हा आगारातून केवळ एक बस यवतमाळकरीता सुटली.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप