पुसदमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:22+5:30

वसंतनगर येथील नागेश कम्प्यूटरच्या समोरील कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, बारा संगणक यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Electronics shop fire in Pusad | पुसदमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

पुसदमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

Next
ठळक मुद्देआठ लाखांचे नुकसान : संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
वसंतनगर येथील नागेश कम्प्यूटरच्या समोरील कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, बारा संगणक यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे सात ते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच एमआयएमचे अध्यक्ष अमजद खान व त्यांचे मित्र अशीर्यान अली नवाब, शाकीर शेख, जुनेद शेख, समीर शेख यांच्यासह नगरसेवक साकिब शाह हे देवदूत बनून आले. अग्निशामक विभागाला पाचारण करून आग विझवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आग भडकलेली असतानाच जोरदार हवा असल्याने ही आग पसरण्याची भीती होती. मात्र येथील कार्यकर्त्यांनी वेळीच धावपळ केल्यामुळे आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Electronics shop fire in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग