शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलांचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्राहकांच्या घरी पोहोचली. त्यांनी रिडींग नोंदविलेसुद्धा. तरीही रिडींग उपलब्ध नसल्याचे बिल ग्राहकांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देरिडिंगशिवाय बिले : दुरुस्तीसाठी कंपनीकडे वेळ नाही, नागरिकांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनच्या नावाखाली सुरू असलेला वीज बिलांचा घोळ कायम आहे. सरासरी युनीटच्या बिलामुळे ग्राहकांच्या माथी अवाजवी रक्कम बसली. दिलेले बिल बरोबरच आहे, असे सांगून ग्राहकांना भरण्यासाठी भाग पाडले जात आहे. वाटल्यास टप्पे पाडून देवू, पण बिल कमी होणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्राहकांच्या घरी पोहोचली. त्यांनी रिडींग नोंदविलेसुद्धा. तरीही रिडींग उपलब्ध नसल्याचे बिल ग्राहकांना देण्यात आले आहे.आधीच अवाजवी बिले आल्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बिल जास्त आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. लॉकडाऊन पूर्वीपासूनच विद्युत कंपनीकडून अवाजवी बिलासंदर्भातील तक्रारी निकाली काढण्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता त्यात लॉकडाऊन काळातील बिलांच्या तक्रारीची भर पडली आहे. अतिशय कमी वीज वापर असलेल्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षाही अधिक बिल देण्यात आले. या बिलाचा भरणा करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. वीज बिलाचा घोळ तात्काळ संपवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.संस्था संघटनांचे आंदोलनवीज ग्राहकांना अवाजवी बिल देण्यात आल्याची ओरड करत संस्था संघटनांनी आंदोलने केली. वीज बिलांची होळी करण्यात आली. दरम्यानच्या काळात २० ते ३० टक्के बिल कमी केले जाईल, असे सांगितले जात होते. आता पुन्हा काही युनीटचे बिल कमी होण्याची हवा सुटली आहे. या संदर्भात नक्की आणि योग्य निर्णय लांबणीवर पडत असल्याने लोकांकडून बिलाचा भरणाही विलंबाने होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :electricityवीजcorona virusकोरोना वायरस बातम्या