वीज बिलांचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:02+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्राहकांच्या घरी पोहोचली. त्यांनी रिडींग नोंदविलेसुद्धा. तरीही रिडींग उपलब्ध नसल्याचे बिल ग्राहकांना देण्यात आले आहे.

Electricity bills continue to fluctuate | वीज बिलांचा घोळ कायम

वीज बिलांचा घोळ कायम

ठळक मुद्देरिडिंगशिवाय बिले : दुरुस्तीसाठी कंपनीकडे वेळ नाही, नागरिकांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनच्या नावाखाली सुरू असलेला वीज बिलांचा घोळ कायम आहे. सरासरी युनीटच्या बिलामुळे ग्राहकांच्या माथी अवाजवी रक्कम बसली. दिलेले बिल बरोबरच आहे, असे सांगून ग्राहकांना भरण्यासाठी भाग पाडले जात आहे. वाटल्यास टप्पे पाडून देवू, पण बिल कमी होणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्राहकांच्या घरी पोहोचली. त्यांनी रिडींग नोंदविलेसुद्धा. तरीही रिडींग उपलब्ध नसल्याचे बिल ग्राहकांना देण्यात आले आहे.
आधीच अवाजवी बिले आल्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बिल जास्त आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. लॉकडाऊन पूर्वीपासूनच विद्युत कंपनीकडून अवाजवी बिलासंदर्भातील तक्रारी निकाली काढण्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता त्यात लॉकडाऊन काळातील बिलांच्या तक्रारीची भर पडली आहे. अतिशय कमी वीज वापर असलेल्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षाही अधिक बिल देण्यात आले. या बिलाचा भरणा करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. वीज बिलाचा घोळ तात्काळ संपवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

संस्था संघटनांचे आंदोलन
वीज ग्राहकांना अवाजवी बिल देण्यात आल्याची ओरड करत संस्था संघटनांनी आंदोलने केली. वीज बिलांची होळी करण्यात आली. दरम्यानच्या काळात २० ते ३० टक्के बिल कमी केले जाईल, असे सांगितले जात होते. आता पुन्हा काही युनीटचे बिल कमी होण्याची हवा सुटली आहे. या संदर्भात नक्की आणि योग्य निर्णय लांबणीवर पडत असल्याने लोकांकडून बिलाचा भरणाही विलंबाने होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Electricity bills continue to fluctuate