वीज बिल माफ झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:44+5:30

लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली.

The electricity bill must be waived | वीज बिल माफ झालेच पाहिजे

वीज बिल माफ झालेच पाहिजे

Next
ठळक मुद्दे३०० युनीटपर्यंतचे बिल रद्द करा : २० ते २५ टक्के सवलत जाहीर करून ग्राहकांची क्रूर चेष्टा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापरत असलेल्या घरगुती ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करावी, या मागणीसाठी वीज ग्राहक संघटनेतर्फे सोमवारी निवेदन देण्यात आले.
संघटनेतर्फे १३ जुलै रोजी वीज बिलांची होळी करून राज्य सरकारला निवेदन दिले जाते. दरम्यान, २० ते ३० टक्के सवलत सरकारने जाहीर केली. हा प्रकार जनतेची क्रूर चेष्टा करणारा असल्याचे सांगत सोमवारी पुन्हा निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापुरकर, विदर्भ उपाध्यक्ष राजू जेकब, दत्ता कुळकर्णी, प्रा.डॉ. अमोल देशमुख, सुहास सावरकर, अविनाश धनेवार, आशीष कुसुम्बीवाल, राजू राजा, मनिष शर्मा, पराग जोशी, अमोल डहाके, विजय भुसेवार आदी उपस्थित होते.

विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना घातले साकडे
यवतमाळ : कोरोना काळातील अवाजवी वीज बिलातून विदर्भातील नागरिकांना मुक्त करा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. कोरोना लॉकडाऊनपासून उद्योग, व्यापार, रोजगार मंदावले आहे. अनेकांचे रोजगार गेले. जवळ खायला पैसा नाही. अशा परिस्थितीत त्यांना अवाढव्य बिल आले आहे. या आपत्ती काळात नागरिकांचे वीज बिल सरकारने भरावे. कोरोनानंतर २०० युनीटपर्यंत वीज बिल मुक्त व नंतरचे वीज दर निम्मे करावे, शेतीपंपाचे वीज बिल थांबवा आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोंगाडे, हेमंत मुदलीयार, मधुसुदन कोवे, अशोक कपिले, श्रीधर ढवस, विजय चाफले, प्रल्हादराव काळे, संजय मेश्राम, युवराज साळवे, विजय आष्टीकर, लताताई जयस्वाल, कविताताई राठोड, सोनाली मरगडे, राजू राजगुरे, संतोष कुकुलवार, राजू कट्यारमल, मनोज अवस्थी, टिन्नू शर्मा, विक्की शर्मा, अमित अग्रवाल, संतोष हर्षे, रितेश शर्मा, अविनाश लष्करी, गणेश तोदी आदींनी निवेदन दिले.

Web Title: The electricity bill must be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज