शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीशियनचा कोर्स कामी आणला; देव्हाऱ्याखाली गावठी दारू साठा लपविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 16:39 IST

जांब-वाघाडीतील प्रकार : पोलीस कारवाईने फुटले बिंग

यवतमाळ : शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य पणाला लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चक्क देव्हाऱ्याच्या खाली दारूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ४० लीटर दारू एकाच जागेवरून जप्त केली. 

सचिन राजू इंगळे (३२) रा. मुलकी यवतमाळ, असे आरोपीचे नाव आहे. सचिनने कला शाखेची पदवी घेतली आहे. शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रीशियनचा कोर्सही केला आहे. घरात गाळलेल्या दारूचे जांब वाघाडी येथील घरात साठा केला जात होता. येथूनच परिसरातील गावांमध्ये दारू पुरवठा सुरू होता. एखाद्या शुद्ध पाण्याच्या प्लांट प्रमाणे अगदी मोटरपंप लावून दारू नळाद्वारे दिली जात होती. यातील सूत्रधार सचिन इंगळे हा पसार आहे. ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे, फौजदार संजय शिंदे, जमादार सुरेश झोटिंग, सुनील दुबे, जयंत ब्राह्मणकर, सचिन घुगे यांनी केली.

अशी लढविली शक्कलसचिनने जांब वाघाडी येथील घरावर ५०० लिटरची टाकी बसविली. त्या टाकीत दारू साठविली जात होती. त्यातून ही दारू घरातील देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या ४० लिटरच्या ड्रममध्ये येत होती. या ड्रमलाही एक विसर्ग देऊन अंगणातील भूमिगत टाक्यांत दारू जमा होत होती. देव्हाऱ्याखालील टाकीतून दारू काढण्यासाठी कुलरचा पंप वापरला होता. बटन दाबताच बाजूला असलेल्या नळातून दारू येत होती. ठोक व चिल्लर अशा दोन्ही स्वरुपाची विक्री येथून सुरू होती. ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून या अवैध व हायटेक दारू विक्री अड्ड्याचा भंडाफोड केला. कारवाईत ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

खरुला येथे भूमिगत दारूसाठा जंगलात रात्री बेरात्री गाळलेली दारू पोलीस कारवाईपासून लपविण्यासाठी गावालगत जमिनीत गाडून ठेवली जाते. याचाही माग काढत ग्रामीण पोलिसांनी खरूला हे गाव गाठले. तेथे दोघांना अटक केली. आकाश देवीदास शेडमाके (२२), विकास देवीदास शेडमाके (२१) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर देवीदास यशवंत शेडमाके (५५), रोहन रमेश मेश्राम (२०) हे दोघे पसार झाले आहेत. या कारवाईतही एक लाख १९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

टॅग्स :Policeपोलिस