शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक नोव्हेंबरअखेर

By admin | Updated: September 29, 2014 23:11 IST

वार्षिक २ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी

नवी रचना : सात जागांची कपात, तीन मतदारसंघ गोठविलेयवतमाळ : वार्षिक २ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी होताच जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वातील २८ सदस्यीय संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१२ ला संपली. परंतु त्यानंतर शासनाकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना मुदतवाढी मिळत गेल्या. आतापर्यंत या संचालक मंडळाचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. लोकसभा व विधानसभेमुळे बँकेची निवडणूक लांबली. परंतु ती आता नोव्हेंबर अखेरीस घेतली जाणार आहे. विशेष असे जिल्हा बँकेची संचालक मंडळाची निवडणूक ही सहकार कायद्यातील नव्या तरतुदी व नव्या रचनेनुसार होणार आहे. बँकेचे सध्या २८ संचालक आहेत. परंतु नव्या रचनेत ही मर्यादा २१ ठेवण्यात आली आहे. अर्थात संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. जुन्या रचनेतील वैयक्तिक, पगारदार आणि डेअरी हे तीन मतदारसंघ गोठविण्यात आले आहे. अनुक्रमे विजय माने, डॉ. रवींद्र देशमुख, अ‍ॅड. अनिरुद्ध लोणकर हे या गोठविलेल्या मतदारसंघांचे विद्यमान संचालक आहे. आता नव्या रचनेत वैयक्तिक पगारदार, डेअरी, जिनिंग-प्रेसिंग, मच्छीमार, मार्केटिंग अशा विविध मतदारसंघांचा एकच संयुक्त मतदारसंघ बनविण्यात आला आहे. त्यातून तीन संचालक निवडून दिले जाणार आहे. या संयुक्त मतदारसंघात सर्वाधिक मते मिळविणाऱ्या तिघांना (तीन टॉपर) संचालक म्हणून घोषित केले जाईल. नव्या रचनेत पाच जागा आरक्षित आहे. त्यातील दोन महिलांसाठी असतील. तर १४ संचालक हे तालुकास्तरावरून निवडून येणार आहे. जुन्या रचनेत महिलांसाठी तीन जागा होत्या. मात्र नव्या रचनेत ही जागा एक ने कमी करण्यात आली. बँक निवडणुक पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होत होत्या. परंतु सहकार खात्याने आता या निवडणुकांसाठी पुण्यात स्वतंत्र इलेक्शन कमिश्नर हे पद व विभाग निर्माण केला आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या सहायाने व इलेक्शन कमिश्नर प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या पुढील निवडणुका होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)