शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे

By admin | Updated: August 22, 2015 02:32 IST

सिंचनातून समृद्धीसाठी जिल्ह्यात सुमारे २५ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे लावण्यात आले.

थकीत वीज बिल : शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्ण यवतमाळ : सिंचनातून समृद्धीसाठी जिल्ह्यात सुमारे २५ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आठ उपसा सिंचन योजनांना कायमचे टाळे लावण्यात आले. जेमतेम वर्षभर सुस्थितीत चालल्यानंतर या संस्थांकडे विजेचे बिल थकले. यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या हिताच्या संस्था कायमच्या बंद पडल्या आहेत. सिंचन प्रकल्पाचा फायदा होत नसलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपसा सिंचन योजना राबविली जाते. यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा, अरुणावती आणि वर्धा नदीवर सुमारे २५ वर्षापूर्वी आठ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यात वर्धा नदीवरील राळेगाव तालुक्यातील संगम, कळमनेर, पैनगंगा नदीवर दिग्रस तालुक्यातील तिवरंग, उमरखेड तालुक्यातील चिंचोली, तिवरी टाकळी, सावळेश्वर, घाटंजी तालुक्यातील ताडसावडी आणि वणी तालुक्यातील नायगाव उपसा सिंचन योजनेचा समावेश होता. नदीच्या पात्रात जॅकवेल बांधण्यात आली. पंप हाऊस उभारण्यात आले. या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. ही योजना पाणी वापर संस्थांना हस्तांतरित झाली. देखभाल दुरुस्ती आणि शेतकऱ्यांकडून पाणी कराच्या वसुलीचे अधिकार पाणी वापर संस्थांना अधिकार देण्यात आले. मात्र जेमतेम वर्षभर या संस्था सुरळीत चालल्या. त्यानंतर या योजनेचे वीज बिल थकीत होत गेले. वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी पुरवठा खंडित केला. त्यामुळे या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. सुरू करण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही. काही उपसा सिंचन योजनेचे मोटारपंप चोरीस गेले असून पाईपचीही चोरी झाली. यामुळे या संस्था कायमच्या अडगळीत पडल्या. महत्वाकांक्षी प्रकल्पातून सिंचन होणे अपेक्षित असताना दुर्लक्षितपणामुळे आठही संस्थांना टाळे लागले. आता आठ पैकी पाच संस्था एका सहकारी साखर कारखान्याला तर तीन संस्था खासगी संस्थेला विकण्यात आल्याची माहिती आहे. ज्या उद्देशाने या संस्था स्थापन झाल्या तो उद्देश पूर्णत्वासच गेला नाही. (शहर वार्ताहर)दोन हजार हेक्टर सिंचन क्षमता जिल्ह्यातील या आठ उपसा सिंचन योजनेची सिंचन क्षमता २००७ हेक्टर होती. शेतकऱ्यांनी या संस्थांच्या भरोश्यावर सिंचनाचे स्वप्न रंगविले. वर्षभर या योजनेतून शेतकऱ्यांना पाणीही मिळाले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणी कराचा भरणा केला नाही. परिणामी या संंस्थांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत झाले. त्यातूनच या संस्था बंद पडल्या. उपसा सिंचन योजनेंतर्गत नदी पात्रात लावण्यात आलेले मोटारपंप आणि लोखंडी पाईप चोरट्यांचे लक्ष ठरले. अनेक ठिकाणचे मोटारपंप आणि पाईप चोरीस गेले. परंतु याचा कुणालाही थांगपत्ता नाही. आता या संस्था एका सहकारी संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्या. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.