शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड

By admin | Updated: November 18, 2016 02:32 IST

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे

निराधारांनाही फटका : दोन दिवसांपासून शेतकरी बँकेसमोर रांगेत, दुष्काळात तेरावा महिनाबाभूळगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे शेतकरी राजा बँकेसमोर कॅश येण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र गुरूवारी निदर्शनास आले. हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेकडून मिळालेला हा दुसरा झटका आहे. सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द ठरविल्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेने १५ नोव्हेंबरपासून आपल्या शेतकरी ग्राहकांकडून आलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांचे या बँकेत खाते आहे. यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांचे इतर बँकांमध्ये खाते नाही. त्यामुळे अंदाजे १५ हजार शेतकरी हक्काची बँक सोडून इतर बँकेच्या दारात नोटा बदलवताना आढळून आले. या बँकेत मंगळवारला दुपारनंतर कॅश संपल्याचे सांगून परत केले गेले. शेतकरी बुधवारी दिवसभर बँकेत बसून राहिले कॅश आली नाही. गुरूवारला बाभूळगावचा आठवडी बाजार असतो. शेतकरी बाजाराकरिता पिशव्या घेऊन बँकेत आले. मात्र कॅश नसल्याने त्यांनी तेथेच ठाण मांडले अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हक्काचा, घामाचा पैसाही त्यांना दिला जात नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून तीन दिवसात बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या गेलेला हा दुसरा झटका आहे. या संबंधात शाखा व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता कॅश आणण्याकरिता नागपूरला गाडी पाठविली होती. कॅश न मिळाल्याने गाडी परत आली, असे त्यांनी सांगितले. काही बँक आपल्या मर्जीनुसार ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे चित्र दृष्टीस पडले. येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत पाचशे रुपयांच्या दहा नोटा जरी बँकेत भरल्या तरी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जात आहे. इतर बँकामध्ये जुन्या नोटा बदलविताना आधारकार्ड मागण्यात येत आहे. यावरून बँकांचा आपसात ताळमेळ नाही, असे दिसते आहे. शेकडोंच्या संख्येत असलेल्या निराधारांची आज मोठी गोची झाली. सहाशे रूपये महिना त्यांना मिळतो. बँकेत दोन हजारांच्याच नोटा असल्याने त्यांना परत केले गेले. काही गरिबांच्या खात्यात केवळ एकच हजार रुपये आहेत. बँकेत दोन हजारांचीच नोट असल्याने त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता आले नाही. परिणामी अनेकांची कामे आणि दैनंदिन व्यवहार खोळंबले आहेत. (प्रतिनिधी)