शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती सप्ताहात कार्यक्रमांची रेलचेल

By admin | Updated: October 3, 2016 00:23 IST

येथील आझाद मैदानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा गांधी यांना अभिवादन : पालकमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभयवतमाळ : येथील आझाद मैदानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनानंतर पालकमंत्र्यांनी व्यसनमुक्ती रॅलीला हिरवी झेंडी दाखविली, तसेच व्यसनमुक्ती सप्ताहाचा शुभारंभ केला. २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहे.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी जया राऊत, सहायक समाजकल्याण आयुक्त पीयूष चव्हाण आदी उपस्थित होते. आझाद मैदान येथून निघालेली व्यसनमुक्ती रॅली येरावार चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा परिषदेच्या आवारात विसर्जित झाली. रॅलीतील विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून व्यसनमुक्ती सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहात जनजागृती करून प्रामुख्याने युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आझाद मैदानात महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले. सुमारे साडेचार लाख शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंगला यांनी सांगितले. गांधी, शास्त्रींना अभिवादनजिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (वार्ताहर)