शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ‘एटीएम’वरील गर्दीने दिवाळीची खरेदीही खोळंबली

By admin | Updated: November 11, 2015 01:56 IST

बहुतेक चाकरमान्यांना दिवाळीची केवळ एक-दोन दिवस सुटी आहे.

अर्धेअधिक बंद : रांगेत उभे राहून ग्राहक त्रस्त, ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियायवतमाळ : बहुतेक चाकरमान्यांना दिवाळीची केवळ एक-दोन दिवस सुटी आहे. खासगी नोकरदारांना तर केवळ एक दिवस सुटी. त्यातच कसेबसे वेळेचे नियोजन करून बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी कुटुंबाला घेऊन निघायचे आणि एटीएमवर जाऊन पैसे काढून पटकन खरेदी करायची, असा अनेकजण बेत आखत आहे. परंतु एटीएमवर जाऊन पाहतात, तर पैसे काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. या रांगांमुळे अनेकांची दिवाळीची खरेदी रेंगाळली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून यवतमाळच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील ग्राहकांसह जिल्हाभरातून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज यवतमाळ शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूकही खोळंबत आहे. अशातच अनेक एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ते बंद आहेत. तर ज्या एटीएममध्ये पैसे आहेत, त्यांच्यासमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. ग्रामीण भागातील अनेकजण यवतमाळला गेल्यावर एटीएममधून पैसे काढून खरेदी करू, असा बेत आखून शहरात दाखल होत आहेत. परंतु, या ठिकाणी आल्यावर एटीएमची परिस्थिती पाहता त्यांना धक्काच बसत आहे. अनेक एटीएम बंद आहेत. तर मोजक्याच एटीएममध्ये पैसे असल्याने अशा ठिकाणी पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरगावहून एटीएमच्या भरवशावर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. अनेक नागरिकांनी तर एटीएमची झंझट नको म्हणून सरळ आपली बँक गाठली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून एटीएम असल्यामुळे बँकेचे तोंडच न पाहणाऱ्यांची अशावेळी कोंडी होत आहे. त्यातच आता दोन दिवस बँकांनाही सुटया आल्या आहेत. अनेकजण बँकांच्या या ढिसाळ कारभाराला दूषणे देत आहे. ऐन सणासुदीच्या काळात जर एटीएममधून पैसे मिळत नसेल, तर ते काय कामाचे, असा संतप्त सवाल करताना ग्राहक दिसत आहेत. (प्रतिनिधी)