कोरोनामुळे आरटीओंच्या कामकाजाचीही वर्गवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:46 PM2020-05-28T19:46:51+5:302020-05-28T19:49:08+5:30

लॉकडाऊन-४ मध्ये यवतमाळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे.

Due to corona, also categorizes the functioning of RTOs | कोरोनामुळे आरटीओंच्या कामकाजाचीही वर्गवारी

कोरोनामुळे आरटीओंच्या कामकाजाचीही वर्गवारी

Next
ठळक मुद्दे‘रेड झोन’मध्ये केवळ नवीन वाहनांची नोंदणी‘नॉन रेड झोन’मध्ये प्रमुख कामे सशर्त चालणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन-४ मध्ये प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे.
रेड झोन व नॉन रेड झोनमधील कोणत्या कार्यालयात कोणती कामे होऊ शकतील या संबंधीचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी २६ मे रोजी जारी केले. त्यानुसार, रेड झोनमध्ये असलेल्या प्रादेशिक (आरटीओ) व उपप्रादेशिक (डेप्युटी आरटीओ) कार्यालयांमध्ये केवळ नवीन वाहनांची नोंदणी होऊ शकणार आहे. नॉन रेड झोनमधील कार्यालयांमध्ये नवीन वाहनांची नोंदणी, वाहन हस्तांतरण, कर्जाचा बोझा चढविणे-उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवाना विषयक कामे, परवाना नूतनीकरण, दुय्यमीकरण आणि अंमलबजावणी विषयक कामे होणार आहे. नॉन रेड झोनमध्ये वाहन चालकांना शिकावू आणि कायमस्वरूपी परवान्यासाठी (ड्रायव्हींग लायसन्स) मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची सक्ती
आरटीओतील कामकाज चालविण्यासाठीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, कार्यालय पूर्णत: सॅनिटाईज करून घ्यावे, त्यासाठी पालिकेची मदत घ्यावी, खासगी संस्थेचीही मदत घेता येईल, हॅन्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे, कर्मचाऱ्यांना नियमित हात सॅनिटाईज करण्याचे बंधन घालावे, मास्क व हातमोजे वापरावे आदी बंधने घालण्यात आली आहे.

वाहन निर्जंतुकीकरण मालकाकडून
वाहनांचा कर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा, खटला विभागातील कामकाज व विभागीय कारवाईचा दंड ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा, कर्मचारी संख्येनुसार कामकाजाचा कोटा निश्चित करावा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, एका व्यक्तीकडून एकच काम स्वीकारावे, कागदपत्रे कमीत कमी हाताळावी, ती सॅनिटाईज करून घ्यावी, कक्षामध्ये बाह्यव्यक्तीला उपस्थित राहू देऊ नये, योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण करण्यासाठी येणाऱ्या वाहनाचे निर्जंतुकीकरण वाहन मालकाच्या खर्चाने करून घ्यावे आदी निर्देश देण्यात आले आहे.

Web Title: Due to corona, also categorizes the functioning of RTOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.