जिल्ह्याचा पारा नऊ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:09+5:30

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे तापमान खाली गेले.

District's mercury at nine degrees | जिल्ह्याचा पारा नऊ अंशांवर

जिल्ह्याचा पारा नऊ अंशांवर

Next
ठळक मुद्देचार दिवस लाट । रब्बीच्या पिकांना उपयुक्त, आंब्याचा बार जळण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शनिवारी यवतमाळचा पारा ९ अंशांपर्यंत खाली घसरला. यावर्षीच्या सर्वात कमी तापमानाची नोंद शनिवारी करण्यात आली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने पुढील चार दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे तापमान खाली गेले.
यामुळे पहाटेपासून शहरात विविध ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहायला मिळाले. थंडीपासून रक्षण करण्यासाठी गरम कपड्यांची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पहायला मिळाली. चहाटपऱ्या आणि भज्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती.
ही थंडी रब्बीच्या पिकांना चांगली आहे. त्याचा गहू आणि हरभºयाला फायदा होणार आहे. मात्र ढगाळी वातावरण आणि धुक्यामुळे तूर, हरभरा, आंबा बार आणि फळपिकांना मोठा फटका बसला आहे. पुढील चार दिवस थंडी कायम राहणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. किरकोळ आजारांकडेही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

काहींसाठी थंडी गुलाबी तर काहींसाठी ठरतेय जीवघेणी
डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने खवैय्यांना आयती संधी मिळाली आहे. ताजा हिरवा भाजीपाला मिळवून नानाविध पदार्थ करण्याची जणू घराघरात स्पर्धा दिसते. तर दुसरीकडे अचानक वाढलेल्या थंडीमुळे आणि मधेच पसरणाºया ढगाळी वातावरणामुळे ग्रामीण भागात गंभीर आजार वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे. तर गंभीर तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले.

Web Title: District's mercury at nine degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.